Virender Sehwag : वीरेंद्र सेहवागसमोर उभे ठाकले मोठे संकट; धाकट्या भावाला पोलिसांकडून अटक; नेमकं प्रकरण काय?(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Virender Sehwag : भारताचा माजी स्फोटक क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग समोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सेहवागचा लहान भाऊ विनोद सेहवाग याला चंदिगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. आता विनोद सेहवाग याला चंदीगडच्या मनीमाजरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विनोद सेहवागला चेक बाऊन्स प्रकरणी न्यायालयात हजर न राहिल्यामुळे फरार घोषित करण्यात आले होते.
वीरेंद्र सेहवागचा लाहान भाऊ विनोद सेहवाग याच्याविरुद्ध कोर्टात ७ कोटी रुपयांचा चेक बाऊन्सचा खटला सुरू आहे. या प्रकरणी त्याला न्यायालयात हजर राहावे लागणार होते. मात्र, तो हजर न राहिल्याने न्यायालयाकडून त्याला फरार घोषित करण्यात आले. कोर्टाने विनोदला फरारी घोषित करताच पोलिसांनी विनोद सेहवागला अटक केली असून त्याला करून कोर्टात हजर केले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर विनोद सेहवागला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विनोद सेहवागच्या वकिलाने कोर्टात जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर लवकरच सुनावणी होणार असल्याची माहीती मिळत आहे.
हेही वाचा : Champions Trophy 2025 : भारताने अंतिम सामना गमावल्यास बसेल ‘इतक्या’ कोटींचा फटका अन्.. ; वाचा सविस्तर..
विनोद सेहवाग हा भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा धाकटा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. वीरेंद्र सेहवागला चार भाऊ आणि बहिणी असून दोन्ही बहिणी त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत. तर भाऊ विनोद हा त्याच्यापेक्षा लहान आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
वीरेंद्र सेहवाग हा भारतीय क्रिकेटमधील स्फोटक सलामीवीरांपैकी एक आहे. तो मैदानात फलंदाजीला आला की त्याच्या स्फोटक फलंदाजीने विरोधी गोलंदाजांना धास्ती भरत असे. त्याच्या फलंदाजीची भीती कित्येक विरोधी टीममधील गोलंदाजांच्या चेहऱ्यावर दिसून येत असे. वीरेंद्र सेहवागने 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल असून वीरेंद्र सेहवागने भारतासाठी सलग 14 वर्षे क्रिकेट खेळले आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने आपली एक वेगळी छाप पडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा नेहमीच राहिला आहे.
वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती. त्याने 374 आंतरराष्ट्रीय सामन्यात 17000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सेहवागने त्याने 104 कसोटी, 251 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले. त्याने कसोटीत 8586 धावा केल्या आणि एकदिवसीय सामन्यात त्याने केलेल्या धावांची संख्या जवळपास सारखीच होती. सेहवागने वनडेमध्ये 8273 धावा केल्या. वीरेंद्र सेहवागच्या आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 394 धावा आहेत.