Champions Trophy 2025 : भारताने अंतिम सामना गमावल्यास बसेल 'इतक्या' कोटींचा फटका अन्.. ; वाचा सविस्तर.. (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IND vs NZ Fina : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. हा अंतिम सामना ९ मार्चला होणार असून दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे हा सामना खूपच अतिटतीचा होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म बघता दोन्ही संघ विजेतपदासाठी मुख्य दावेदार मानले जाता आहेत. तरीही अनेकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे. की, भारताने हा सामना गमावला तर भारताचे किती आर्थिक नुकसान होणार आहे? याबद्दल जाणून घेऊ.
वास्तविक पाहता संपूर्ण भारत देश टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. भारत आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकून दाखवणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत भारताच्या पराभवाबद्दल चर्चा करणे चुकीचे ठरेल. परंतु, तरीही जर भारताचा अंतिम सामन्यात पराभव झाला, तर त्याचे किती नुकसान होईल? या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आयसीसी कडून या सामन्याची बक्षीस रक्कम 29.23 कोटी ठरवण्यात आली आहे.
अंतिम सामना भारताने हा सामना गमवाला तर त्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अंतिम विजेत्या आणि उपविजेत्या संघाची एकूण रक्कम २९.२३ कोटी रुपये आहे. यातील 19.49 कोटी रुपये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला मिळणार आहे. तर उपविजेता ठरणाऱ्या म्हणजेच अंतिम फेरीत पराभूत संघाला 9.74 कोटी रुपये देण्यात येतील. यावरून दिसून येत की, विजेता संघ आणि उपविजेता संघ यांच्यात सुमारे 10 कोटी रुपयांचा (9.75 कोटी) फरक आहे. जर टीम इंडिया फायनलमध्ये पराभूत झाल्यास तिला 19.49 कोटी या रकमेचे नुकसान सोसावे लागणार आहे.
भारतीय संघाचा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चांगला रेकॉर्ड राहीला आहे. पण, आयसीसी स्पर्धांच्या फायनलचा विचार केला असता न्यूझीलंड संघ बळकट दिसून येत आहे. न्यूझीलंड संघाने आतापर्यंत भारताविरुद्ध दोन आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले असून दोन्ही सामन्यात विजय मिळला आहे. एक सामान्य 2000 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आहे आणि दुसरा 2021 ची WTC फायनल सामन्याचा समावेश आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाने सलग चार सामने जिंकले आहेत. संघाला एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही. अशा परिस्थितीत भारत अजिंक्य राहून जेतेपद आपल्या नावे करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
भारतीय संघाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा
न्यूझीलंड संघाची प्लेइंग 11
विल यंग, डेरेल मिचेल, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओ’रोर्क