Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey U-18 Asia Cup: कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा भिडणार! भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार हायव्होल्टेज लढत; अंतिम फेरीत कोण मारणार बाजी?

IND vs PAK Semi-final Hockey U-18 Asia Cup: अंअंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत आजभारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमिफायनलचा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. यावेळी शानदार प्रदर्शन करत असलेल्या टीम इंडियाची नजर फायनलच्या तिकिटावर असणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 05, 2026 | 01:31 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारत-पाकिस्तान हॉकी महासंग्राम
  • अंतिम फेरीत कोण मारणार बाजी?
  • भारताची विजयी घोडदौड
अंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा महामुकाबला रंगणार आहे. जपानमधील काकामिगाहारा येथे होणाऱ्या या सेमिफायनल सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंतच्या कामगिरीतून विजेतेपदासाठी आपली मजबूत दावेदारी सिद्ध केली आहे. आता सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य भारतीय खेळाडूंसमोर असणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन संघामध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी एक चुरशीची लढत अपेक्षित आहे.

ICC: न भूतो न भविष्यती! Women’s T20 World Cup विजेत्यांवर कोट्यवधींचा वर्षाव; बक्षीस रक्कम पाहून व्हाल थक्क

भारताची विजयी घोडदौड

भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात कझाकिस्तानवर १३-० अशा दणदणीत विजयाने केली. त्यानंतर जपानविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला, मात्र त्या पराभवातून धडा घेत संघाने शानदार पुनरागमन केले. कोरियाला ४-१ ने नमवल्यानंतर भारतीय संघाने चायनीज तायपेईचा १३-१ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने आतापर्यंत ३२ गोल केले असून केवळ ६ गोल स्वीकारले आहेत.

केतन कुशवाहावर असणार मोठी जबाबदारी

भारतीय संघाचा कर्णधार केतन कुशवाहा Ketan Kushwaha उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने स्पर्धेत आतापर्यंत ७ गोल केले आहेत. तसेच आशीष टानी पूर्तीनेही ६ गोल करत संघाच्या विजयात योगदान दिले आहे. गाझी खान आणि शाहरुख अली यांनीदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रशिक्षक सरदार सिंग यांनी पेनल्टी कॉर्नर आणि बचावातील त्रुटींवर विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले आहे.

पाकिस्तानकडूनही कडवे आव्हान

पाकिस्तानने आपल्या गटात दमदार खेळ करत उपांत्य फेरी गाठली आहे. बांगलादेशवर ५-२ असा विजय मिळवत त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भारतासाठी हा सामना सोपा नसेल. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे नेहमीच भावनिक आणि तणावपूर्ण वातावरण असते. त्यामुळे दोन्ही संघांवर दबाव असणार आहे.

भारतीय महिला टीम देखील जबरदस्त फॉर्ममध्ये

दरम्यान, भारतीय महिला संघ देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यांनी आपले तिन्ही सामने जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी ३० गोल केले असून त्यांच्यावर फक्त दोन गोल झाले आहेत. उपांत्य फेरीत त्यांचा सामना चीनशी होईल. भारतीय संघ आपली विजयी मालिका कायम ठेवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.

IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?

Web Title: India vs pakistan u18 hockey asia cup 2026 semi final ketan kushwaha final spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Indian hockey team
  • Indian Men's Hockey Team

संबंधित बातम्या

तब्बल 22 रुपयांनी स्वस्त झालं Petrol – Diesel, सरकारचा मोठा निर्णय; जनतेने घेतला सुटकेचा श्वास
1

तब्बल 22 रुपयांनी स्वस्त झालं Petrol – Diesel, सरकारचा मोठा निर्णय; जनतेने घेतला सुटकेचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.