IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?
ICC च्या घोषणेनुसार, Women’s T20 World Cup 2026 जिंकणाऱ्या संघाला २३,४०,००० अमेरिकन डॉलर्स रक्कम मिळणार आहे. ही रक्कम आयपीएल विजेत्या आरसीबीला मिळालेल्या बक्षीस रकमेपेक्षाही जास्त असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला २०२६ चा महिला टी२० विश्वचषक जिंकल्याबद्दल २० कोटी रुपये मिळाले होते.
महिला टी२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला ११,७०,००० अमेरिकी डॉलर्स मिळतील. दोन्ही उपांत्य फेऱ्यांमधील पराभूत संघांना ६,७५,००० अमेरिकी डॉलर्स मिळतील. स्पर्धेतील प्रत्येक गट सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला स्वतंत्र बोनसही दिला जाणार आहे. प्रत्येक विजेत्या संघाला ३१,१५४ अमेरिकी डॉलर्स मिळणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १२ संघांना किमान २,४७,५०० अमेरिकी डॉलर्सचा बक्षीस निधी मिळणार आहे. त्यामुळे लहान संघांनाही आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.
Women’s T20 World Cup 2026 ही अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण प्रथमच या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार आहेत. यामुळे महिला क्रिकेटचा जागतिक विस्तार अधिक वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड आणि वेल्समधील विविध मैदानांवर ३३ सामने खेळवले जाणार आहे.
ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी महिला क्रिकेटचा वेगाने होत असलेला विकास पाहता ही वाढीव बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. वाढलेली प्राइज मनी, वाढता प्रेक्षकवर्ग आणि जागतिक स्तरावरील लोकप्रियता यामुळे महिला क्रिकेट एका नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.






