Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL Live: गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?

IND vs SL Live Score 1st Test Match Interrupted Due to rain: आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. परंतु पावसामुळे सामना सुरु होण्यास विलंब होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 16, 2026 | 01:08 PM
IND vs Sri Lanka 2nd Test Weather Report

IND vs Sri Lanka 2nd Test Weather Report

Follow Us
Follow Us:
  • गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच!
  • पहिलं सत्र रद्द
  • दुसऱ्या सत्रालाही विलंब
IND vs SL Live Score 1st Test Match Interrupted Due to rain: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने २ विकेट्स गमावून २८८ धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने फलंदाजीत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो १३१ धावांवर नाबाद होता. केएल राहुल ७७ धावा करून दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. आता, दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाकडून अशाच फलंदाजीच्या कामगिरीची अपेक्षा आहे, परंतु त्याआधी पावसाने सामन्यात खोळंबा घातला आहे.

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

पहिले सत्र पावसामुळे रद्द, खेळाचे दुसरे सत्र लांबणीवर

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला विलंब झाला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ अद्याप सुरू झालेला नाही. पहिले सत्र पावसामुळे पूर्णपणे रद्द झाले आणि दुसरे सत्रही अद्याप सुरू झालेले नाही.

दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र जोरदार पावसामुळे रद्द करण्यात आले. पावसामुळे दिवसाचा खेळ अद्याप सुरू झालेला नाही, त्यामुळे लंच ब्रेक घेण्यात आला आहे. आज सकाळपासून गॉलमध्ये अधूनमधून पाऊस पडत असल्याने दिवसाच्या खेळाला सुरुवात होऊ शकलेला नाही. पाऊस थांबल्यावर खेळपट्टीवरील कव्हर्स काढण्यात आले, परंतु, त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. पाऊस थांबल्यास, दुसरे सत्र भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:२० वाजता सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली होती. परंतु, मैदानातील कव्हर्स अजूनही काढण्यात आलेले नाही.

पडिक्कलचा ‘मौके पे चौका’

श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीसाठी देवदत्त पडिक्कलने दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत भारतीय संघात पुनरागमन केले. पडिक्कलने या संधीचे सोने करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले आणि दिवसाचा खेळ संपताना १३१ धावांवर नाबाद राहिला. पडिक्कलने सलामीवीर केएल राहुलसोबत पहिल्या दिवशी दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आणि भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११

भारत – यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

श्रीलंका – लाहिरू उदारा, निशान फर्नांडो, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो

Hockey World Cup 2026: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामने? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Web Title: India vs sl 1st test live score rain delay galle test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Rain Update
  • Sri Lanka cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
1

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
2

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.