Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: लंकेची वाट लावणार Team India! भारतीय संघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज; काय सांगतो रेकॉर्ड?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सिरिज केवळ द्विपक्षीय लढत नसून, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पॉईंट्स टेबलच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2026 | 09:40 PM
IND Vs SL: लंकेची वाट लावणार Team India! भारतीय संघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज; काय सांगतो रेकॉर्ड?
Follow Us
Follow Us:
  • 15 ऑगस्टपासून सुरू होणार भारत-श्रीलंका टेस्ट सिरिज 
  • शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
  • जसप्रीत बुमराहचे संघात झाले पुनरागमन  
India Vs Sri Lanka Test Series: भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 15 ऑगस्टपासून भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळणार आहे. 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान ही सिरिज खेळली जाणार आहे. ही टेस्ट सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे. शुभमन गिल भारताचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान श्रीलंकेत भारतीय संघाचा रेकॉर्ड कसा आहे त्याबाबत जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सिरिज केवळ द्विपक्षीय लढत नसून, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पॉईंट्स टेबलच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. 7 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये चार दिवस सराव सामना खेळवला जाणार आहे. तर पहिला सामना 15 ते 19 तर दुसरा सामना 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल भारताचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये 9 सामन्यानंतर 48.15 पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध चांगले प्रदर्शन केल्यास न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सिरिजआधी भारताची स्थिती अधिक मजबूत होऊ शकते.

India Vs Sri Lanka: 3 स्पिनर्स, पंत IN प्रसिद्ध कृष्णा-पडिक्कल Out, श्रीलंकाविरुद्ध भारताचा मजबूत Playing XI संघ

श्रीलंकेत भारतीय संघाचा रेकॉर्ड आतापर्यंत अत्यंत चांगला राहिला आहे. 1985 ते 2017 पर्यन्त दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 24 कसोटी सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये भारताने 9 सामने जिंकले आहेत. तर 7 सामन्यात पराभव झाला आहे. तर 8 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने श्रीलंकेत 1985 मध्ये कोलंबोमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता.

2015 मध्ये श्रीलंकेने भारताला पराभूत केले होते. तो सामना श्रीलंकेने 63 रन्सने जिंकला होता. त्यानंतर भारताने एकही सामना गमावला नाही. पाच पैकी पाच सामने भारताने जिंकले आहेत. 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेचा दौरा केला होता. तेव्हा टी सिरिज भारताने जिंकली होती.  श्रीलंकेत भारताचा रेकॉर्ड गेल्या काही वर्षांपासून चांगला राहिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकणे आवश्यक असणार आहे.

IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…

भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहमंद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, स्रांश जैन.

Web Title: India vs sl test series 15 aufgust to 27 august for wt final know team india record in test matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Test Series
  • WTC 2027

संबंधित बातम्या

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
1

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
2

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.