
IND vs SL 2nd Test Playing 11
केवळ तीन भारतीय खेळाडू श्रीलंकेत खेळले आहेत
भारतीय संघ नऊ वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी सामना खेळणार आहे. या दौऱ्यासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघापैकी केवळ तिघांनाच श्रीलंकेत कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. केएल राहुलने पाच, रवींद्र जडेजाने दोन आणि कुलदीप यादवने एक सामना खेळला आहे. याचा अर्थ, १५ भारतीय खेळाडूंपैकी केवळ आठ जणांनाच श्रीलंकेत कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे.
Cheating: चुटकी वाजवून फसवणूक! इंग्लंडमध्ये प्रचंड खळबळ, नव्या घोटाळ्याने हादरलं क्रिकेट जग
श्रीलंकेतील परिस्थिती बरीच वेगळी
श्रीलंकेतील खेळपट्ट्या भारतातील खेळपट्ट्यांपेक्षा वेगळ्या आहेत. तेथील क्रिकेटच्या खेळपट्ट्या साधारणपणे संथ, कमी उसळी देणाऱ्या आणि फिरकीला अनुकूल असतात, ज्यामुळे सामना जसजसा पुढे जातो तसतसे फिरकी गोलंदाजांना खूप मदत होऊ शकते. येथे भारतीय फलंदाजांसाठी फलंदाजी करणे सोपे नसेल. भारताच्या फलंदाजीला फिरकी गोलंदाजीसमोर नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. २०२४ च्या श्रीलंका दौऱ्यात, एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली होती. जेफ्री वँडरसे, डुनिथ वेल्स आणि चरित असलंका या तीन श्रीलंकन फिरकी गोलंदाजांनी मिळून २१ बळी घेतले होते.
कसा आहे श्रीलंकेतील आकडा
श्रीलंकेतील भारताचा कसोटी विक्रम
भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेत २४ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी संघाने ९ सामने जिंकले असून ७ गमावले आहेत, तर ८ सामने अनिर्णित राहिले आहेत. संघाने येथे खेळलेल्या शेवटच्या दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. २०१७ मध्ये भारताने तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली होती. २०१५ मध्ये त्यांनी तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली होती.