Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने पुन्हा भारताला छेडलं, मग काय! आकाश चोप्राने चांगलचं धुतलं

भारताने आतापर्यंत ७ सामन्यात ७ विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय वेगवान गोलंदाज अक्षरश: आग ओकत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 03, 2023 | 02:30 PM
पाकिस्तानच्या माजी खेळाडूने पुन्हा भारताला छेडलं, मग काय! आकाश चोप्राने चांगलचं धुतलं
Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड कप २०२३ : विश्वचषकात टीम इंडिया तुफान फॉर्ममध्ये आहे. वानखेडेवर गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) झालेल्या सामन्यात भारताने भलामोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ३५८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रीलंकेला हे आव्हान अजिबात पेलवलं नाही. श्रीलंकेचा अख्खा संघ अवघ्या ५५ धावांत गारद झाला. भारताने हा सामना तब्बल ३०२ धावांनी जिंकला. या विजयात फलंदाजांनी जेवढा वाटा उचलला, त्यापेक्षा जास्त चर्चा भारताच्या गोलंदाजांची आहे. टीम इंडियाचा फायरब्रँड गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) ५ विकेट घेत श्रीलंकेचं कंबरडं मोडलं. याशिवाय मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) ३ तर बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताने आतापर्यंत ७ सामन्यात ७ विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय वेगवान गोलंदाज अक्षरश: आग ओकत आहेत. भारताची गोलंदाजी पाहून विरोधी संघांना धडकी भरत आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये वेगळंच ‘लॉजिक’ लावलं जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रजाने (Hasan Raza) मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना गोलंदाजीसाठी दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करण्याची अजब मागणी केली आहे.

हसन रजाने पाकिस्तानात एका टीव्ही शोदरम्यान शमी-सिराजला दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करण्याची मागणी केली. या शोमध्ये अँकरने हसन रजाला विचारलं, “बॉलमध्ये फरक असतो का? कारण भारतीय गोलंदाजांची बोलिंग एवढी स्विंग होत आहे, ज्यामुळे ते केवळ गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळतात की काय असं वाटतं” त्यावर हसन रजा म्हणाला,”जेव्हा टीम इंडियाची गोलंदाजी सुरु होते, तेव्हा DRS चे निर्णयही त्यांच्याच बाजूने जातात. 7-8 DRS असे होते, ज्याचा फायदा भारताला झाला. मात्र शमी आणि सिराज हे अॅलन डोनाल्ड आणि एनटिनीप्रमाणे खतरनाक झाले आहेत. मला वाटतं दुसऱ्या डावात बॉल बदलला जातो. त्यामुळे या बॉलची चौकशी व्हायला हवी. यावर चर्चा व्हायला हवी. कारण मला तर या सर्वावर संशय आहे”

दरम्यान, हसन रजा हा कोणी मोठा खेळाडू नाही. त्याने पाकिस्तानकडून केवळ ७ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २७ च्या सरासरीने केवळ २३५ धावा केल्या होत्या. तर १६ वन डे सामन्यात २४२ धावाच त्याच्या नावावर आहेत.

आकाश चोप्राने धुतलं
हसन रजाच्या या अजब मागणीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash Chopra) चांगलंच धुतलं. खरोखरच हा गंभीर शो आहे का? जर नसेल तर कॉमेडी शो किंवा तत्सम नाव द्या, असं आकाश चोप्रा म्हणाला.

Web Title: India vs sri lanka world cup 2023 mohammed shami mohammed siraj hasan raza akash chopra world cup 2023 international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2023 | 02:30 PM

Topics:  

  • india
  • India vs Sri Lanka
  • international cricket
  • Mohammed Shami
  • Mohammed Siraj
  • Sri Lanka
  • World Cup 2023

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
2

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
3

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
4

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.