भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर पावसाचे संकट (फोटो- ai gemini)
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान उद्या, म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून 5 टी 20 सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. या सिरिजमधला पहिला सामना लखनऊ येथील ‘भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम’वर संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉस संध्याकाळी ६:३० वाजता केला जाणार आहे.
टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
लखनऊमध्ये उद्या दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, सामन्यादरम्यान पावसाच्या सरी कोसळू शकतात. संध्याकाळच्या वेळी पाऊस पडल्यास टॉस होण्यास आणि सामना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, शहरात १० ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता खालीलप्रमाणे राहील:
IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?
लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी अन् गोलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र येथील खेळपट्टी संथ राहण्यासोबतच फिरकी गोलंदाजांना अधिक अनुकूल ठरताना दिसली आहे. मात्र, नव्या चेंडूने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सामना पुढे सरकेळ तसा खेळपट्टी अधिक संथ होऊ शकते. त्यामुळे या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणे जास्त योग्य ठरू शकते.






