
india vs west indies
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या २०२७ मधील वनडे वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे. या सिरिजमध्ये सर्वांचे लक्ष विशेषतः स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर असेल. विराटसाठी ही सिरिज केवळ सरावाची नसून इतिहास रचण्याची मोठी संधी ठरणार आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा दोन मोठे रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.
या सिरिजमध्ये शानदार फलंदाजी केल्यास विराट कोहली वनडे फॉरमॅटमध्ये मायदेशात सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज होऊ शकतो. सध्या हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. हा रेकॉर्ड मोडण्याची संधी विराटकडे असणार आहे. याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांत मोठ्या रन्स उभारून सचिन तेंडुलकरचा आणखी एक ऐतिहासिक टप्पा पार करण्याचा पराक्रम विराट कोहली करू शकतो.
विराट कोहलीने आतापर्यंतच्या आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत १४,९४१ धावा केल्या आहेत. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सिरिजमध्ये त्याला १५,००० रन्सचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या ५९ रन्सची गरज आहे. विराटने या ५९ रन्स पूर्ण करताच, एकदिवसीय फॉरमॅटमध्ये १५,००० किंवा त्याहून अधिक रन्स करणारा तो भारतरत्न सचिन तेंडुलकरनंतरचा जगातील केवळ दुसरा खेळाडू ठरणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर, यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जायसवाल, नमन धीर.