Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’

Hockey: या विजयामुळे भारताने FIH ज्युनियर महिला विश्वचषकासाठीची आपली पात्रता निश्चित केली आहे. तिकडे चीनमध्ये सानिकाने गोल केला आणि इकडे कोल्हापूरच्या नूल गावात एकच जल्लोष सुरू झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 14, 2026 | 03:16 PM
भारत सलग तिसऱ्यांदा आशिया चॅम्पियन

भारत सलग तिसऱ्यांदा आशिया चॅम्पियन

Follow Us
Follow Us:
  • नूलची कन्या सानिका मानेचा ऐतिहासिक विजयी गोल
  • भारत सलग तिसऱ्यांदा आशिया चॅम्पियन
  • महिला ज्युनियर आशिया कप भारताने जिंकला 
पुणे/Hockey: चीनमधील हॉकी मैदानावर काही क्षणांसाठी जणू सगळा आवाज थांबला होता, आणि त्यानंतर आला तो सुवर्णक्षण—ज्याने सानिका चंद्रकांत मानेचे आयुष्य कायमचे बदलून टाकले. कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्याशा नूल गावातून आलेल्या सानिकाने चीनविरुद्धच्या महिला ज्युनियर आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात १७व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करत भारताला १-० अशी संस्मरणीय विजयी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत भारताने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर आशिया कपचे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला. अंतिम सामन्यातील या अफाट कामगिरीसाठी सानिकाला ‘सामनावीर’ (प्लेअर ऑफ द मॅच) पुरस्काराने गौरविण्यात आले.

सानिकाच्या रक्तातच खेळाचा वारसा आहे. तिची आई ज्योती या माजी राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू असून मोठी बहीण कृष्णानेही राष्ट्रीय पातळीवर हॉकीचे प्रतिनिधित्व केले आहे, तर तिचे वडील चंद्रकांत हे शेतकरी आहेत. सुरुवातीला ॲथलेटिक्सकडे कल असलेल्या सानिकाने पुढे हॉकीची कास धरली. तिची गुणवत्ता सर्वप्रथम प्रशिक्षक अनिकेत मोरे यांनी हेरली. त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) दर्जेदार प्रशिक्षणामुळे तिच्या खेळाला तांत्रिक परिपक्वता व नवा आत्मविश्वास मिळाला. प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित सुविधांवर मात करत सानिकाने गावच्या मैदानावरून थेट भारतीय ज्युनियर संघात स्थान पटकावले.

स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी

चीनमधील २०२६ ज्युनियर आशिया कप स्पर्धेत सानिका भारताच्या आक्रमक फळीतील हुकमी एक्का ठरली

·            द. कोरियाविरुद्ध: भारताच्या ४-१ विजयात १ गोल नोंदवला.

·            मलेशियाविरुद्ध: ११-१ अशा एकतर्फी विजयात २ गोल डागले.

·            जपानविरुद्ध: १ गोल करत भारताला मजबूत आघाडी दिली.

·            पाकिस्तानविरुद्ध: २ सुरेख गोल झळकावत वर्चस्व राखले.

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

१७व्या मिनिटाचा तो निर्णायक गोल

यजमान चीनविरुद्धचा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा ठरला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी कडवी टक्कर दिली तरी गोलशून्य बरोबरी राहिली. अखेर दुसऱ्या क्वार्टरमध्ये १७व्या मिनिटाला सर्कलमध्ये आलेला एक लांब पास हेरून सानिकाने क्षणाचाही विलंब न करता अचूक फटक्याने चेंडू गोलजाळ्यात धाडला आणि स्कोअरबोर्ड १-० असा झाला. यानंतर चीनने बरोबरी साधण्यासाठी आक्रमणांची मालिका रचली; मात्र भारतीय बचावफळीने प्रत्येक हल्ला परतावून लावत अंतिम शिट्टी वाजेपर्यंत १-० अशी विजयी आघाडी कायम राखली.

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

विश्वचषकाची पात्रता आणि जल्लोष

या विजयामुळे भारताने FIH ज्युनियर महिला विश्वचषकासाठीची आपली पात्रता निश्चित केली आहे. तिकडे चीनमध्ये सानिकाने गोल केला आणि इकडे कोल्हापूरच्या नूल गावात एकच जल्लोष सुरू झाला. शेतकरी कुटुंबातील लेकीने जगाच्या मंचावर भारताचा तिरंगा फडकवल्याने गावकऱ्यांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी केली. सानिकाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करताना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहयोगी उपाध्यक्ष, हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष आणि हॉकी महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे म्हणाले, “सानिका मानेने मिळवलेले हे यश अत्यंत मोठे आहे. आशिया कपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक गोल करून भारताला विजेतेपद मिळवून देणे ही महाराष्ट्राच्या हॉकीसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

Web Title: India womens junior china and win asia hockey cup kolhapur girl sanika mane sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Hockey
  • kolhapur
  • Sports News

संबंधित बातम्या

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई
1

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

Tennis: पहिले बळकावला अव्वल दर्जा, आता US Open मिळवले; Aryna Sabalenka ला हरवणारी Elena Rybakina कोण आहे
2

Tennis: पहिले बळकावला अव्वल दर्जा, आता US Open मिळवले; Aryna Sabalenka ला हरवणारी Elena Rybakina कोण आहे

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…
3

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…

टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद, शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद; तब्बल २२ संघांचा समावेश
4

टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद, शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद; तब्बल २२ संघांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.