Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची सुवर्ण कामगिरी! फायनलमध्ये पाकिस्तान चारिमुंड्या चित; टीम इंडियाने जिंकले FIH Youth Hockey5s आशियाई विजेतेपद

india won FIH Youth Hockey 5s Championship: भारताच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ ने पराभूत करून एफआयएच युथ हॉकी ५एस आशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 01:38 PM
भारताची सुवर्ण कामगिरी! फायनलमध्ये पाकिस्तान चारिमुंड्या चित; टीम इंडियाने जिंकले FIH Youth Hockey5s आशियाई विजेतेपद
Follow Us
Follow Us:
  • भारताने जिंकले FIH Youth Hockey5s आशियाई विजेतेपद
  • फायनलमध्ये पाकिस्तान चारिमुंड्या चित
  • हॉकी इंडियाने जाहीर केले रोख पारितोषिक
एफआयएच युथ हॉकी 5s आशियाई ( FIH Youth Hockey 5 s) चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान २५ जुलै रोजी मस्कट येथे खेळला गेला. भारतीय सब-ज्युनियर पुरुष संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. भारताने सामन्याच्या १३ व्या मिनिटापर्यंत तीन गोल केले, ज्यानंतर पाकिस्तानी संघाला सामन्यात कमबॅक करता आले नाही. रोमित पाल, कर्णधार केतन कुशवाहा आणि शाहरुख अली यांनी भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजवाली. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ एलिट पूलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

IND vs ZIM: तिसऱ्या टी20साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल? श्रेयस अय्यरने दिले संकेत

अंतिम सामन्यात पाकिस्तनाला चारली धूळ

भारतीय सब-ज्युनियर पुरुष हॉकी संघाने मागील सामन्यात पाकिस्तानला ७-३ अशा फरकाने पराभूत केले होते. विजेतेपदाच्या सामन्यात,अचूक पास आणि शिस्तबद्ध डावपेचांच्या जोरावर भारताने सुरुवातीलाच आघाडी घेतली. भारताचा पहिला गोल पहिल्या हाफच्या ५ व्या मिनिटाला झाला, त्यानंतर कर्णधार केतन कुशवाहाने १२ व्या मिनिटाला आणि शाहरुख अलीने १३ व्या मिनिटाला गोल करून भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानकडून मोहम्मद उस्मानने १६ व्या मिनिटाला गोल केला, पण तो पहिला आणि शेवटचा गोल राहिला. त्यानंतर त्यांना गोल करता आला नाही. एफआयएच युथ हॉकी ५एस आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी एफआयएच युथ हॉकी ५एस विश्वचषक स्पर्धेतही आपले स्थान निश्चित केले आहे.

𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒. 𝐆𝐋𝐎𝐑𝐘. 𝐑𝐄𝐖𝐀𝐑𝐃𝐄𝐃. 🥇🇮🇳 To honour Team India’s gold medal-winning campaign at the Men’s & Women’s Youth Hockey5s Asian Championship Muscat 2026, Hockey India has announced a cash award of ₹2 lakh for each player and ₹1 lakh for each member of the… pic.twitter.com/bKR6QWAhNn — Hockey India (@TheHockeyIndia) July 25, 2026
𝐆𝐫𝐢𝐭. 𝐏𝐫𝐢𝐝𝐞. 𝐑𝐞𝐜𝐨𝐠𝐧𝐢𝐭𝐢𝐨𝐧. 🥈🇮🇳 To honour Team India’s silver-medal finish at the Men’s & Women’s Youth Hockey5s Asian Championship Muscat 2026, Hockey India has announced a cash award of ₹1 lakh for each player and ₹50,000 for each member of the support… pic.twitter.com/Np01Q9ae2U — Hockey India (@TheHockeyIndia) July 25, 2026

हॉकी इंडियाने जाहीर केले रोख पारितोषिक

अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, हॉकी इंडियाने भारतीय युवा खेळाडूंसाठी रोख पारितोषिकांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला २ लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. एफआयएच युथ हॉकी ५एस आशियाई चॅम्पियनशिपच्या महिलांच्या स्पर्धेत, भारतीय सब-ज्युनियर संघाने चीनविरुद्ध २-४ अशा अटीतटीच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करल्यानंतर रौप्य पदक जिंकले.भारतीय महिला संघासाठीही हॉकी इंडियाने रोख पारितोषिकांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला ५०,००० रुपये रोख दिले जातील.

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’

Web Title: India won fih youth hockey 5s asia championship 2026 india vs pakistan final hockey india prize money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Hockey Team India
  • Indian Men's Hockey Team

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानची बॅंड वाजवण्यास सज्ज; पुरुष अन् महिला संघ प्रत्येकी 2 सामने खेळणार, काय आहे वेळापत्रक?
1

भारत पाकिस्तानची बॅंड वाजवण्यास सज्ज; पुरुष अन् महिला संघ प्रत्येकी 2 सामने खेळणार, काय आहे वेळापत्रक?

FIH Youth Hockey 5s : भारताचा हॉकीमध्ये पाकिस्तानवर ‘स्ट्राईक’; मोठ्या फरकाने मिळवत कायम ठेवली विजयी मालिका
2

FIH Youth Hockey 5s : भारताचा हॉकीमध्ये पाकिस्तानवर ‘स्ट्राईक’; मोठ्या फरकाने मिळवत कायम ठेवली विजयी मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.