Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?
भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने खुलासा केला आहे की, झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करावे लागू शकतात. झिम्बाब्वेवर ९० धावांनी विजय मिळवून टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला झालेल्या दुखापतीमुळे रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यासाठी संघाला काही बदल करावे लागू शकतात.
आपल्या दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू टाकत असताना स्नायू दुखावल्यामुळे प्रिन्स मैदानाबाहेर गेला. दुखापत होण्यापूर्वी त्याने दोन विकेट्स घेतले होते. सामन्यानंतर अय्यर म्हणाला की, दुर्दैवाने आमचा एक खेळाडू जखमी झाला आहे, त्यामुळे रविवारच्या सामन्यासाठी संघात काही बदल होऊ शकतात. ईशान आणि तिलक यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. मला वाटले होते की या खेळपट्टीवर १८० ते २०० धावा आव्हानात्मक ठरेल परंतु, आम्ही २२० धावा केल्या, जे संघासाठी बोनस ठरले. मैदानावर आपली हीच वृत्ती असायला हवी. वर्तमानात राहणे आणि आपल्या योजना अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.’
आजच्या सामन्यात प्रभसिमरन सिंगला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते. तो अभिषेक शर्माची जागा घेऊ शकतो. अभिषेक गेल्या काही डावांमध्ये संघर्ष करत आहे. जरी त्याने मागच्या सामन्यात गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी, कामाच्या ताणामुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. प्रभसिमरन आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने सलग दोन हंगामात ५०० हून अधिक धावा केल्या आहेत.
तिसऱ्या टी२० सामन्यात हर्ष दुबे पदार्पण करू शकतो. त्याने यापूर्वीच एकदिवसीय पदार्पण केले असून, दोन सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतले आहेत. दुबे फिरकी गोलंदाजीसह खालच्या फळीत चांगली फलंदाजीही करू शकतो. रवी बिश्नोईने गेल्या काही डावांमध्ये प्रभावी कामगिरी केलेली नाही, त्यामुळे आज हर्ष त्याची जागा घेऊ शकतो.
वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, मयंक यादव, प्रिन्स यादव, यश ठाकूर.
हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’






