Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Hockey : भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडूंचे मनोमिलन; मनदीप सिंग आणि उदिता कौर अडकले विवाहबंधनात… 

भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडू आज 21 मार्च रोजी विवाहबद्ध झाले आहेत. जालंधरचा ऑलिम्पिक पदक विजेता स्टार खेळाडू मनदीप सिंग आणि भारतीय महिला संघाची हॉकीपटू उदिता कौर यांनी आज लग्न केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 21, 2025 | 06:49 PM
Indian Hockey : भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडूंचे मनोमिलन; मनदीप सिंग आणि उदिता कौर अडकले विवाहबंधनात… 
Follow Us
Close
Follow Us:

Indian Hockey : भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडू आज 21 मार्च रोजी विवाहबद्ध झाले आहेत. जालंधरचा ऑलिम्पिक पदक विजेता स्टार खेळाडू मनदीप सिंग आणि भारतीय महिला संघाची हॉकीपटू उदिता कौर यांनी आज लग्न केले आहे. भारतीय महिला संघात उदिता कौर बचावपटू म्हणून खेळते. या दोघांनी सात फेरे घेताच ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले आहेत. मनदीप सिंग आणि उदिता कौर यांनी जालंधरच्या मॉडेल टाऊनमध्ये गुरुद्वारा सिंग सभेच्या सात फेऱ्या मारल्या.

या विवाह सोहळ्यात सरचिटणीस भोला सिंगसह भारतीय हॉकी संघाचा संपूर्ण संघ हजर होता.  मनदीपच्या आईने सांगितले की, आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे. या लग्नामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक दोघांमध्येही आनंदाचे वातावरण होते. तसेच मनदीपच्या आईने  उदिताला सून नव्हे तर मुलगी म्हणून ठेवणार असल्याचे सांगितलेअ आहे.

हेही वाचा: IPL 2025 : IPL 2025 पूर्वीच ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रुद्रावतार; षटकार-चौकारांची आतिषबाजी करत ठोकले शतक; पहा Video

2018 मध्ये पहिल्यांदा भेटलो..

माध्यमांसोबत बोलताना उदिता म्हणाली की, आम्ही दोघेही भारतीय संघाकडून खेळतो. 2018 मध्ये आशिया क्रीडा स्पर्धेदरम्यान आम्हा  दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि आज लग्न झाले. कोरोनाच्या काळात दोघांचे नाते अधिक घट्ट होत गेले. यादरम्यान दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले.

प्रेमकहाणी कोरोनामध्ये फुलली..

मनदीप आणि उदिता दोघेही कुटुंब आणि बाहेरच्या जगापासून दूर एकाच कॅम्पमध्ये अडकून होते. जिथे त्यांनी एकत्र जास्त वेळ घालवायला सुरुवात केली आणि एकमेकांच्या कंपनीत त्यांना सर्वात जास्त आराम मिळत असे. साथीच्या आजाराच्या एकाकी काळामध्ये एकमेकांना बोलण्यात आणि पाठिंबा देण्यात बराच वेळ घालवला. त्यामुळे ते अधिक जवळ आले. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तसतसे ते जास्त जवळ येत गेले. मैत्री म्हणून जे सुरु झाले ते प्रेमात परिवर्तीत झाले. आता काही वर्षांनंतर दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत.

हेही वाचा: Chahal-Dhanashree Divorce : धनश्रीपासून घटस्फोटाने खचला चहल, मास्कआड लपवल्या अश्रूधारा; पहा Video…

महिला हॉकी संघ ऑलिम्पिकमध्येही पदक आणणार..

यावेळी उदिता माध्यमांशी बोलताना म्हणाली की, भारतीय पुरुष संघाप्रमाणेच महिला संघ देखील हॉकीमध्ये पदक मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच मनदीप म्हणाला की, आजचा दिवस आनंदाचा आहे. आता हे दोघेही भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करून देशासाठी पदक जिंकून आणणार आहेत.

आता रंगणार आयपीएलचा थरार..

आयपीएल 2025  चा पहिला सामना 22  मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30  वाजता सुरु होणार आहे.

Web Title: Indian hockey team players mandeep singh and udita kaur got married

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • Indian hockey team
  • Love Marriage
  • married life
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी
1

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान
2

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर
3

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला
4

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.