ऑस्ट्रेलियन खेळाडू जेक फ्रेझर मॅकगर्क-(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या जेक फ्रेझर मॅकगर्कने मैदान गाजवले आहे. त्याने आपला रुद्रावतार दाखवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने खेळलेल्या सराव सामन्यात त्याने अवघ्या 39 चेंडूंचा सामना करत 110 नाबाद धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये त्याने 9 चौकार आणि 10 षटकार लगावले आहेत. त्याने केवळ षटकार आणि चौकारांच्या मदतीने 96 धावा चोपून काढल्या आहेत. त्याच्या या खेळीने त्याने विरोधी संघाना जणू इशाराच दिल्याचे बोलले जात आहे.
आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला कायम ठेवले नाही. मात्र या 22 वर्षीय खेळाडूला लिलावादरम्यान त्याला आपल्या ताफ्याच्या बाहेरही जाऊ दिले नाही. दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर मॅकगर्कला 9 कोटी रुपये खर्च करून आपल्याच ताफ्यात प घेतले.
हेही वाचा : Chahal-Dhanashree Divorce : धनश्रीपासून घटस्फोटाने खचला चहल, मास्कआड लपवल्या अश्रूधारा; पहा Video…
जेक फ्रेझर मॅकगुर्कच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, तो आतापर्यंत आयपीएलचे एकूण नऊ सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने नऊ डावांमध्ये 36.67 च्या सरासरीने 330 धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये मॅकगर्कचा स्ट्राइक रेट २३४.०५ राहिला आहे.
TEAM TOTAL: 289 🤯
JFM’s SCORE: 110* 🥵 pic.twitter.com/FT1hSsYjlA— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 20, 2025
अक्षर पटेल (कर्णधार), फाफ डु प्लेसिस (उप-कर्णधार), जेक फ्रेझर मॅकगर्क, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी. नटराजन, समीर रिझवी, करुण नायर,आशुतोष शर्मा, मुकेश कुमार, मोहित कुमार, विराजमान शर्मा, विराजमान शर्मा, डी इरा, अजय मोंडल, त्रिपुराण विजय, माधव तिवारी आणि मानवंत कुमार.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.