सुमित नागल : भारतीय टेनिसपटूं सुमित नागल हा आर्थिक संकटाशी झुंजत आहे. सुमित नागल याने यासंदर्भात स्वतः सांगि[blurb content=””]तले आहे की तो आर्थिक संकटाशी झुंजत आहे. देशामधील नंबर १ टेनिसपटू सुमितने एटीपी टूर खेळण्यासाठी १ कोटी रुपयांची व्यवस्था केली होती. परंतु आता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये फक्त ८०,००० रुपये शिल्लक आहेत असे त्याने सांगितले. सुमितला या वर्षाच्या सुरुवातीला त्याचे मित्र सोमदेव देववर्मन आणि क्रिस्टोफर मार्क्विस यांनी आर्थिक मदत दिली, पण आता ती पुरेशी नाही.
मागील काही वर्षांपासून जर्मनीतील नॅन्सेल टेनिस अकादमीमध्ये टेनिसचा सराव करत होता. परंतु आता त्याला आर्थिक अडचणींमुळे येथे सराव करता येत नाही. सुमितने २० सप्टेंबर रोजी मीडियासमोर आपल्या व्यथा मंडळी. अमर उजालामध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या निवेदनानुसार आता त्यांच्याकडे वर्षाच्या सुरुवातीला जेवढे पैसे होते तेवढेच पैसे शिल्लक आहेत. सुमितने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या माझ्याकडे माझ्या बँक खात्यात या वर्षाच्या सुरुवातीला जेवढे पैसे होते तेवढेच पैसे शिल्लक आहेत. हे सुमारे ८०,००० रुपये आहे. या काळात मला काही मदतही मिळाली पण माझ्याकडे कोणी मोठा प्रायोजक नाही. मला IOCL कडून मासिक पगार मिळतो, पण माझ्याकडे पैशाचा कोणताही मोठा स्रोत नाही.
२०२३ मध्ये सुमित नागलने आतापर्यत २४ टेनिस स्पर्धांमध्ये भाग घेऊन ६५ लाख रुपये कमावले आहेत. या कालावधीमध्ये त्याला यूएस ओपनमध्ये सर्वात मोठी बक्षीस रक्कम मिळाली होती. जिथे तो पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडला त्यामध्ये सुमित नागरला सुमारे १८ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते. आपल्या कमाई आणि खर्चा बाबत सुमितनागल की म्हणाले मी जे काही कमावतो, ते मी खर्च करतो. माझा वार्षिक खर्च सुमारे एक कोटी रुपये आहे. माझ्याकडे फक्त १ प्रशिक्षक असल्याच्या बाबतीत हे घडते.गेल्या काही वर्षांत मी देशाचा नंबर-१ टेनिसपटू आहे, पण असे असूनही मला तेवढा पाठिंबा मिळत नाही. मला वाटते की दुखापतीमुळे माझे रँकिंग घसरले तेव्हाही कोणालाही मला मदत करणे योग्य वाटले नाही. मी पुनरागमन करू शकेन यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. हे निराशाजनक आहे कारण मला असे वाटते की मी जे काही करतो ते पुरेसे नाही.