फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरूध्द श्रीलंका : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण वाढत चालले आहे त्याचबरोबर दुसरीकडे भारताचा महिला संघ सध्या संघ श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्राय सिरीज खेळत आहेत यामध्ये भारताचा संघ हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडियाने कमालीची कामगिरी केली आहे. उद्या म्हणजेच १० मे रोजी भारतीय महिला संघ ट्राय सिरीजचा फायनलचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. भारताच्या संघाला या मालिकेमध्ये एक पराभवाला सामोरे जावे लागले आहे, हा पराभव भारताचा श्रीलंकेविरूध्द झाला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघासाठी हा सामना नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.
श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या या ट्राय सिरीजमध्ये आतापर्यतची काय स्थिती आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारताचे या मालिकेमध्ये चार सामने खेळवण्यात आले यामध्ये भारताने तीन सामन्यात विजय मिळवला आहे तर 1 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेचा पहिला सामना भारत विरूध्द श्रीलंका यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताच्या महिला संघाने श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करुन संघाने मालिकेचा पहिला विजय नावावर केला होता. त्यानंतर भारताचा दुसरा सामना 20 एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिका विरूध्द खेळवण्यात आला होता.
दक्षिण आफ्रिका विरूध्द भारत यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता. या सामन्यात भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 15 धावांनी पराभूत केले होते. या मालिकेत तीन संघ सहभागी झाले होते. यामध्ये या मालिकेत भारताच्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने चार सामने जिंकले आहेत, यामध्ये त्यांना दोन सामन्यात विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. भारताचा तिसरा सामना श्रीलंकेविरूध्द खेळवण्यात आला होता या सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
4 मे रोजी झालेल्या भारत विरूध्द श्रीलंका या सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात श्रीलंकाने भारताचा 3 विकेट्सने पराभव केला होता. या मालिकेमध्ये भारताचा शेवटचा साखळी सामना दक्षिण आफ्रिकेविरूध्द झाला होता या सामन्यात भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती. त्याचबरोबर जेमिमा रोड्रिक्स हिने 123 धावांची खेळी खेळली होती. या सामन्यात भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 23 धावांनी पराभूत केले होते. आता भारतीय महिला संघाच्या नजरा ट्राय सिरीजच्या फायनलच्या सामन्यावर असणार आहेत.