
india vs hong kong
तीन सप्टेंबरला होणार भारत विरुद्ध हाँगकाँग सामना
भारताने पहिल्या सामन्यात केला थायलंडचा पराभव
5 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान भिडणार
India Vs HongKong/ Asia Cup 2026: महिला आशिया कप 2026 स्पर्धेची सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना थायलंडविरुद्ध झाला. भारताने हा सामना जिंकला आहे. आता लगेच दुसरा सामना भारतीय महिला संघ खेळणार आहे. हा सामना 3 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत विरुद्ध हाँगकाँग यांच्यात होणार आहे. भारतीय संघ आपली विजयी घौडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय संघ सध्या या स्पर्धेत एक मजबूत संघ म्हणून खेळताना दिसणार आहे.
महिला टी२० आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाने धडाकेबाज सुरुवात करत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने थायलंडवर 94 रन्सने मोठा विजय प्राप्त केला आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ 3 सप्टेंबर रोजी हाँग काँगविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.
भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सवर 159 रन्सचा स्कोअर केला . शेफाली वर्माने शानदार खेळी केली. तिने 64 रन्सची शानदार आक्रमक खेळी केली. मात्र त्याच्यासमोर थायलंडचा संपूर्ण संघच 65 रन्सवर ऑल आउट झाला. त्यामुळे भारताने मोठा विजय प्राप्त केला आहे.
पहिल्या सामन्यात सलामीवीर शेफाली वर्माची तुफानी फटकेबाजी आणि दीप्ती शर्माच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने थायलंडचा पराभव केला. आता ३ सप्टेंबरला हाँग काँगला नमवून ५ सप्टेंबरच्या पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यासाठी आत्मविश्वास उंचावण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ सध्या सर्वात ताकदवान संघ म्हणून ओळखला जात आहे. भारतीय संघाने थायलंडविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे आणि उत्कृष्ट नेट रन रेटमुळे ग्रुप ‘अ’ मध्ये पहिले स्थान पटकावले आहे. भारत आणि पाकिस्तान सामना 5 तारखेला होणार आहे.
महिला आशिया कप २०२६ स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि थायलंड यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने आपल्या मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. भारताने ९४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना अष्टपैलू दीप्ती शर्मासाठी खास होता. हा दीप्तीच्या कारकिर्दीतील १५० वा टी२० आंतरराष्ट्रीय सामना होता.