IPL 2025: Big blow to BCCI! South African players withdraw from IPL? Ordered to return home to play WTC..
IPL २०२५ : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ एक आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. आता आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यातील काही खेळाडू पुन्हा भारतात परत आले असून ते आपापल्या आयपीएल संघात सहभागी होत आहेत. अशातच बीसीसीआयला झटका देणारी एक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी आयपीएल प्लेऑफमधून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण देशाच्या क्रिकेट मंडळाने देशासाठी खेळणे हे लीगपेक्षा वरचे असले पाहिजे या भूमिकेचे समर्थन केले आहे.
बीसीसीआयने सोमवारी पुष्टी केली की आयपीएल १७ मे रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. सुधारित वेळापत्रकामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटपटूंसाठी पेच निर्माण झाला आहे, जे डब्ल्यूटीसी फायनल खेळणार आहेत. फ्रँचायझी आणि बीसीसीआयने परदेशी बोर्डाना लीगच्या उर्वरित सामन्यांसाठी त्यांचे खेळाडू उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. तथापि, सीएसएने पुन्हा सांगितले आहे की डब्ल्यूटीसी फायनलची तयारी ही त्यांची प्राथमिकता आहे.
हेही वाचा : Neeraj Chopra च्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ खास पदवीसह प्रादेशिक सैन्यात मिळाली मोठी जबाबदारी..
सीएसएचे राष्ट्रीय संघ आणि उच्च कामगिरी संचालक एनोच एन्क्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, तो पुन्हा लीगमध्ये खेळू इच्छितो की नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही एक गोष्ट स्पष्ट केली आहे की आम्ही बीसीसीआय आणि आयपीएलशी बोलत आहोत. परंतु डब्ल्यूटीसी फायनलच्या तयारीचे वेळापत्रक तेच राहील. कसोटी खेळाडूंसाठी अंतिम तारीख २६ मे आहे. आमची प्राथमिकता वर्ल्ड टेस्ट फायनल आहे जी बदलणार नाही.
जून रोजी लंडनमध्ये होणाऱ्या फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचे आठ क्रिकेटपटू कागिसो रबाडा (गुजरात टायटन्स), लुंगी एनगिडी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स), एडन मार्कराम (लखनऊ सुपर जायंट्स), रायन रिकेल्टन (मुंबई इंडियन्स). कॉर्बिन बॉश (मुंबई इंडियन्स), मार्को जॅन्सन (पंजाब किंग्ज) आणि वियान मुल्डर (सनरायझर्स हैदराबाद) यांचा संघात समावेश आहे. आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होणार आहे. यामध्ये गुजरात टायटन्स, आरसीबी, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहेत.