IPL 2025: BCCI's head! Using pressure tactics on foreign boards to get players to play in IPL 2025? Read in detail..
IPL 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत जाणाऱ्या तणावामुळे बीसीसीआयकडून आयपीएल 2025 एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु आता १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. अशातच आता आयपीएलसाठी बीसीसीआय आणि आयपीएल संघ परदेशी बोर्डांवर त्यांचे खेळाडू पाठवण्यासाठी दबाव आणत असल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे अजूनही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आयपीएलचे सीओओ हेमांग अमीन यांना सुरक्षेच्या चिंता दूर करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी वैयक्तिकरित्या संवाद साधण्यासाठी सांगण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे ९ मे रोजी आयपीएल 2025 स्पर्धा पुढे ढकलण्यात आलीया आहे. तथापि, एका दिवसानंतर, युद्धबंदीची घोषणा केली गेली. ज्यामुळे आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘आम्ही परदेशी बोर्डांशी खाजगीरित्या बोलत आहोत तर संघ त्यांच्या खेळाडूंशी थेट संपर्क साधत आहेत. आम्हाला आशा आहे की त्यापैकी बहुतेक खेळाडू हे आयपीएल 2025 खेळण्यासाठी परत येतील.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतात परतायचे की नाही हा निर्णय खेळाडूंवर सोपवला आहे. संघ अधिकाऱ्यांकडून पीटीआयला सांगण्यात आले आहे की, काही परदेशी खेळाडू अद्यापही त्यांच्या पुनरागमनाबद्दल साशंक आहेत. पण बहुतेकजण परत येण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथ म्हणाले की, “काल रात्री सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आम्ही आमच्या परदेशी खेळाडूंशी संपर्क साधत आहोत. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आमचा सामना २० मे रोजी आहे त्यामुळे अजूनही अवधी आहे.”
पंजाब किंग्जचे ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टोइनिस आणि जोश इंग्लिस परतण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. तथापि, मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग त्यांना समजवत असल्याचा प्रयत्न करता आहेत. ऑस्ट्रेलियाचे झेवियर बार्टलेट, आरोन हार्डी, अफगाणिस्तानचे अझमतुल्ला उमरझाई आणि दक्षिण आफ्रिकेचे मार्को जानसेन पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. तर पंजाब प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
तसेच सनरायझर्स हैदराबाद संघात कर्णधार पॅट कमिन्स आणि तडाखेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेड हे संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणारा जोस बटलर देखील आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करण्यास तयार झाला आहे.