शहीद आफ्रिदी(फोटो-सपक्षल मीडिया)
Shahid Afridi : मागील दोन आठवडे झाले भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत होता. सध्या युद्धबंदी करारामुळे हा तणाव हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे. परंतु दोन्ही देशांमधील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नसून बिकट झाले आहेत. या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी हा भारताविरुद्ध गरळ ओकण्याचे कामं करत होता. आता असा दावा करण्यात येत आहे की, जो जाणून सर्वांनाच धक्का बसेल, पाकिस्तानच्या पुढच्या पंतप्रधानासाठी शाहिद आफ्रिदीच्या नावाची चर्चा होत आहे. पुढचा पंतप्रधान म्हणून शाहिद आफ्रिदीचे नाव पुढे येऊ लागले आहे.
असे बोलले जात आहे की, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा पंतप्रधान झाला तर शेजारी देशांना नुकसान होईल असे बोलले जाता आहे. कारण, आफ्रिदी त्याच्या बेताल बोलण्यांसाठी ओळखला जातो. एवढेच नाही तर तो अनेकदा भारताविरुद्ध आग ओकत असतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईबाबत त्याने बऱ्याच वेळा भारताविरुद्ध आग ओकली आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला ततेव्हा संपूर्ण भारत देश हादरला होता. ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. या तणावपूर्ण वातावरणात देखील आफ्रिदीकडून आगीत तेल ओतण्याचे काम सुरूच राहिले.
आफ्रिदी पाकिस्तानचा पंतप्रधान होणार?
आता आफ्रिदीबद्दल एक मोठा दावा करण्यात येत आहे. भारताविरुद्ध आफ्रिदीच्या अनेक वक्तव्यांनी सोशल मीडियावर अनेक ठळक बातम्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही लोकांनी आफ्रिदीची तुलना माजी पंतप्रधान इम्रान खानशी देखील केली, जो क्रिकेटच्या दिग्गजापासून लोकप्रिय राजकारणी बनला आणि पाकिस्तानचा पंतप्रधानही झाला होता. याच कारणास्तव असा दावा केला जात आहे की आफ्रिदी देखील पुढचा पंतप्रधान असू शकतो.
हेही वाचा : Virat Kohli : ‘रोहित-विराट २०२७ चा वर्ल्डकप खेळण्याची शक्यता कमी..’, माजी दिग्गज क्रिकेटपटूचे विधान चर्चेत..
भारताकडून १०० दहशतवाद्यांनचा खात्मा
शाहिद आफ्रिदीकडून रविवारी कराचीमध्ये “यौम-ए-तशकूर” रॅलीमध्ये भाग घेण्यात आला होता. जिथे त्याने पाकिस्तानी सैन्याने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईचे कौतुक केले. तसेच त्याने त्यांनी आणखी एक खोटा दावा केला, तो म्हणाला की, भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये निष्पाप मुलांचा बळी गेला. वास्तविक पाहता भारताने फक्त पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले. ज्यामध्ये १०० दहशतवादी मारले गेले आहेत.