शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. तथापि, आयपीएलचा अंतिम सामना आता ३ जून रोजी होणार असल्याने बीसीसीआयला अनेक अडचणींना सामोरे जावं लगता आहे. ज्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासोबतच, शुभमन गिल आयपीएलच्या मध्यात गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा देखील होऊ लागल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा हा २० जूनपासून सुरू होणार आहे. अलिकडच्या काळात रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच भारत-इंग्लंड मालिका सुरू होण्याआधी भारत-अ संघाचा इंग्लंड दौरा ३० मे पासून सुरू होणार होता, परंतु आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यामुळे, भारत-अ संघ आणि इंग्लंडच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, भारत-अ संघात यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन या खेळाडूंचा समावेश करण्यात येऊ शकतो. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यात इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल या रूपात दोन मोठी नावे इंडिया-अ संघाकडून खेळू खेळताना दिसू शकतात. इतकेच नाही तर त्याच अहवालात असे देखील सांगण्यात आले आहे, की अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती इंडिया-अ च्या पहिल्या सामन्यासाठी १४ सदस्यीय संघ निवडण्याची शक्यता आहे. या संघात अशा खेळाडूंना स्थान देण्यात येऊ शकते की जे आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरणार नाहीत.
शुभमन गिलला आयपीएलच्या मध्यभागी इंग्लंडचा दौरा करावा लागू शकतो असा देखील एक मोठा दावा करण्यात येत आहे. पण आढकण अशी आहे की, गुजरात टायटन्स सध्या आयपीएल प्लेऑफसाठी एक प्रबळ दावेदार मानले जात आहे. अशा परिस्थितीत जर गिल गेला तर त्याला संघाचे कर्णधारपदही सोडावे लागणार आहे आणि त्याचा फटका हा संघाला बसेल.
त्याच वेळी, काही इतर अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की गिल आयपीएलचे सर्व सामने खेळल्यानंतरच इंडिया-अ मध्ये सामील होणार आहे. सतेच शुभमन गिल, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर हे इंडिया-अ च्या दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीपाठोपाठ शुभमन गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्याची चर्चा सुरू आहे. त्याच वेळी, विराट कोहलीच्या जागी दुसरा खेळाडूचा शोध घेतला जात आहे. अशा परिस्थितीत, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया तरुण खेळाडूंसह काय चमत्कार करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.