Fire News: Fire breaks out at five-star hotel in Hyderabad; SRH team was staying there, major tragedy averted..
Fire News : भारतात सध्या आयपीएल 2025 चा थरार सुरू आहे. आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू असून आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. आता गुणतालिकेत देखील बदल दिसू लागले आहेत. अशा वेळी आयपीएलचे सर्वच संघ हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई यांसह महत्त्वाच्या शहरात दौरे करत असल्याचे दिसत आहेत. तसेच विविध संघांच्या खेळाडूंचा मुक्काम देखील या शहरांतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच सनराईजर्स हैदराबादचा पूर्ण संघ हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरातील पार्क हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. तेव्हा अचानक येथील हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे. अचानक आग लागल्याने सर्वांचीच पळापळ झालीय आहे. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. सर्व खेळाडू सुखरूप असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, हैदराबादमधील हॉटेल पार्क हयातमध्ये रविवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग एका संपूर्ण मजल्यालात पसरली होती. या आगीची माहिती मिळताच तत्काळ फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये आयपीएलचा हैद्राबादचा संघ मुक्कामी होता. त्यामुळे, सर्वांनी एकच धावाधाव करत या खेळाडूंना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या, आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तर, सनराईजर्स हैदराबाद संघाचे सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. याबाबत माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
हेही वाचा : DC vs MI : ‘या खेळीबद्दल आठवण नको..’, स्फोटक खेळीने दिल्ली गाजवणाऱ्या करुण नायरकडून नाराजीची आर्त हाक…
आग लागल्याची महाइति मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे, फायर ब्रिगेडच्या जवानांनी कसलेही नुकसान न होऊ देता हॉटेलमधून एसआरएच संघाला आणि रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळवले. सुदैवाने या आगीत कुठलीही हानी झाली नसल्याचं पीटीआयकडून सांगण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत २०५ धावा केल्या. ज्यामध्ये रोहितने १८, रिकेल्टनने ४१, सूर्यकुमार यादवने ४०, तिलक वर्मा यांनी ५९ आणि नमन धीरने नाबाद ३८ धावा केल्या. त्या जोरावर मुंबईने २०५ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्ली एकेकाळी विजय मिळवेल असे वाटत असताना मुंबईच्या गोलंदाजांनी सामना फिरवला आणि १२ धावांनी विजय मिळवला. दिल्लीकडून करुण नायरने चांगली कामगिरी केली. त्याने ८९ धावा केल्या तर अभिषेक पोरेलने ३३, केएल राहुलने १५, आशुतोष शर्माने १७ आणि विप्राजने १४ धावा केल्या परंतु विज्यापासून दुरच राहिले.