फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru/ Chennai Super Kings सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore : आयपीएल २०२५ चा आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघामध्ये महमुखबला खेळवला जाणार आहे. चेपॉकमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ खूप घाम गाळत आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली असल्याने चाहत्यांना शुक्रवारी रंगतदार लढतीची अपेक्षा आहे. आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला, तर चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला .
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी, संघाचे फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक, वेगवान गोलंदाज यश दयाल आणि जोश हेझलवूड यांनी सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामन्यातील प्रतिस्पर्ध्याबद्दल उघडपणे बोलले. दिनेश कार्तिकने गेल्या काही वर्षांपासून सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात सामना होतो तेव्हा तो सर्वात मोठा सामना असतो. जोश हेझलवूडचा असा विश्वास आहे की या सामन्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे चाहते. दरम्यान, यश दयालने गेल्या हंगामातील आठवणींना उजाळा दिला जेव्हा आरसीबीने चेन्नईला हरवून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली होती.
आयपीएलच्या गेल्या हंगामात, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, चेन्नईने १९ षटकांत ६ गडी गमावून १८४ धावा केल्या आणि संघाला प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी १७ धावांची आवश्यकता होती. यश दयालच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने षटकार मारला पण त्याने आपला संयम गमावला नाही आणि धोनीला बाद केले आणि बंगळुरूला पात्र ठरण्यास मदत केली.
आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये यश दयालने शेवटच्या षटकाबद्दल म्हटले आहे की, “फाफ डू प्लेसिसने मला आधीच सांगितले होते की मला शेवटचे षटक टाकावे लागेल, मी त्या षटकाबद्दल खूप गंभीर होतो कारण मला हे सिद्ध करायचे होते की मी ते करू शकतो, जेव्हा षटकार मारला गेला तेव्हा विराट भैय्याने मला ते समजावून सांगितले. षटकारांमुळे आम्हाला वेळ मिळाला, त्याने मला सांगितले की वेगवान चेंडू मारणे सोपे आहे, हार्ड लेन्थ किंवा स्लोअर माझ्यासाठी चांगले काम करत होते आणि त्याने मला ते स्लोअर षटकात मिसळण्यास सांगितले आणि मी प्रयत्न केला आणि यश मिळाले.”
𝗪𝗵𝗮𝘁 𝗺𝗮𝗸𝗲𝘀 𝗥𝗖𝗕 𝘃𝘀 𝗖𝗦𝗞 𝗴𝗮𝗺𝗲 𝘀𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹? The icons, the hype, the rivalry, the noise, the grandeur, the nostalgia – many more reasons to make #RCBvCSK a blockbuster clash. But it’s the quality of cricket that should make the headlines! 📰 Hear what our… pic.twitter.com/YRNC4GJFuL — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 27, 2025