फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad match toss update : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यांमध्ये हैदराबादच्या संघाने मैदानावर धावांचा पाऊस पडला होता तर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे लखनौचा संघ सध्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. आजच्या सामन्यांमध्ये सुपर जायंट्सच्या संघाने एक बदल केला आहे यामध्ये त्यांनी आवेश खानला प्लेइंग ११ मध्ये सामील केले आहे.
मागील सामन्यांमध्ये रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विशेष कामगिरी करू शकला नव्हता त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या त्यांच्यावर नजरा असणार आहेत. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पुरनने संघासाठी कमालीची कामगिरी केली होती. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर ट्रॅव्हिस हेड, इशांन किशन सारख्या फलंदाजांनी मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध धावांचं वादळ आणलं होत.
एसआरएचने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. आवेश खान तंदुरुस्त आहे म्हणून एलएसजीने त्याला शाहबाज अहमदच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. आजच्या सामन्यात दोन्ही संघ जिंकून आपले स्थान मजबूत करू इच्छितात.
🚨 Toss 🚨@LucknowIPL won the toss and elected to bowl against @SunRisers in Hyderabad.
Updates ▶ https://t.co/X6vyVEvxwz#TATAIPL | #SRHvLSG pic.twitter.com/9PJ6Oo6YFR
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि सिमरजित सिंह
एडेन मार्कराम, अब्दुल समद, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), निकोलस पूरन, डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, आवेश खान
एडेन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकिपर), डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, एम. सिद्धार्थ, अब्दुल समद, हिम्मत सिंग, आरएस हंगरगेकर, आकाश महाराज सिंग, आवेश खान, मॅथ्यू ब्रीट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, आकाश दीप, मयंक यादव, शमर जोसेफ, अर्शीन कुलकर्णी.
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, अॅडम झम्पा, सचिन बेबी, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, वियान मुल्डर, राहुल चहर, अथर्व तायडे, ईशान मलिंगा, कामिंदू मेंडिस.