फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आयपीएल २०२६ च्या आधी खेळाडूंच्या दुखापतीच्या बातम्या अनेक समोर येत आहेत. सोशल मिडियावर याबाबत मोठ्या चर्चा सुरू आहेत. अनेक खेळाडू हे आयपीएल 2026 मधून बाहेर झाले आहेत. आयपीएल २०२६ च्या आधी, दुखापतींशी झगडणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आकाश दीपच्या जागी नवीन खेळाडूची घोषणा केली आहे. आकाशच्या जागी केकेआरने युवा डावखुरा गोलंदाज सौरभ दुबेला करारबद्ध केले आहे. दुबे यापूर्वी एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. मात्र, तो एक अत्यंत प्रतिभावान गोलंदाज आहे. कोलकातासाठी आगामी हंगाम आव्हानात्मक दिसत आहे.
सर्वप्रथम, बीसीसीआयच्या निर्देशांमुळे केकेआरला मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त करावे लागले. त्यानंतर हर्षित राणा आणि आकाश दीप दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. या तीन वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे कोलकाताचा वेगवान गोलंदाजीचा मारा लक्षणीयरीत्या कमकुवत झाला आहे. तीन वेळच्या विजेत्या संघाने मुस्तफिजुरच्या जागी ब्लेसिंग मुझारबानीला संघात स्थान दिले आहे. राणाच्या बदली खेळाडूची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, कोलकाताने सौरभ दुबेला अधिकृतपणे आपल्या संघात सामील केले आहे. दुबेने यापूर्वी आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात आपले नाव नोंदवले होते, परंतु तो विकला गेला नाही. सौरभ १२१५ व्या क्रमांकावर होता. त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती, पण तो विकला गेला नाही. मात्र, आता कोलकाताने त्याला संघात सामील केले असून, तो आयपीएल २०२६ मध्ये केकेआरकडून खेळताना दिसेल.
🚨KKR signed Saurabh Dubey as Akashdeep replacement. Left arm seamer. pic.twitter.com/WZ6Maaj9v8 — कट्टर KKR समर्थक 🦁🇮🇳 ™ (@KKRWeRule) March 22, 2026
सौरभ दुबे हा २८ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म २३ जानेवारी १९९८ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. तो विदर्भ संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने अद्याप एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. २०२२ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने त्याला करारबद्ध केले होते, परंतु दुखापतीमुळे तो एक सामना खेळू शकला नाही. दुबेने आपल्या कारकिर्दीत आठ लिस्ट ए सामने खेळून १६ बळी घेतले आहेत. या २८ वर्षीय खेळाडूला तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही बळी मिळालेला नाही.






