Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : आयपीएल सुरू होण्यापूर्वीच चेन्नईला मोठा धक्का, MS Dhoni जखमी! सुरूवातीच्या सामन्यामध्ये खेळणार नाही…

जर तुम्ही महेंद्रसिंग धोनी किंवा चेन्नई सुपर किंग्सचे चाहते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक असू शकते. एम.एस. धोनी आयपीएल २०२६ चे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 28, 2026 | 11:43 AM
फोटो सौजन्य - Chennai Super Kings सोशल मिडिया

फोटो सौजन्य - Chennai Super Kings सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

चेन्नई सुपर किंग्सचे नाव बनलेला महेंद्रसिंग धोनी दुखापतीमुळे आयपीएल २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांसाठी मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही महेंद्रसिंग धोनी किंवा चेन्नई सुपर किंग्सचे चाहते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक असू शकते. होय, चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक-फलंदाज एम.एस. धोनी आयपीएल २०२६ चे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे एम.एस. धोनी अंदाजे दोन आठवड्यांसाठी मैदानाबाहेर राहणार आहे.

धोनीला पोटरीची दुखापत झाली असून तो अद्याप त्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. शनिवारी सकाळी सीएसकेने एक निवेदन जारी करून या बातमीला दुजोरा दिला. “धोनी सध्या पुनर्वसन उपचार घेत असून तो पहिल्या दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर राहील,” असे या निवेदनात म्हटले आहे. चेन्नई आपला पहिला सामना ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळेल. 

Official Statement MS Dhoni is currently undergoing rehabilitation for a calf strain. As a result, he is likely to miss the first two weeks of TATA IPL 2026. Get well soon, Thala! 💛🦁 pic.twitter.com/4dgmt5EWFi — Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2026

यापूर्वी, संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने जाहीर केले होते की, या हंगामात संघात सामील झालेला संजू सॅमसन त्याच्यासोबत सलामीला फलंदाजी करेल. आता हे स्पष्ट झाले आहे की, धोनीच्या अनुपस्थितीत तो यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळेल. या संघात सॅमसनला धोनीचा एक योग्य पर्याय म्हणून पाहिले जात आहे. उर्विल पटेल हा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघासाठी आणखी एक पर्याय आहे आणि त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही, पण तो यष्टीरक्षण करणार नाही अशी शक्यता आहे.

IPL 2026 : RCB vs SRH येणार पहिल्या सामन्यात आमनेसामने! सामना पावसामुळे रद्द होणार का, सलामीच्या सामन्यात कसे असेल हवामान?

गेल्या काही हंगामांपासून धोनीला दुखापतींनी ग्रासले आहे. त्याच्या गुडघ्याची दुखापत ही त्याच्यासाठी एक मोठी समस्या ठरली आहे. २०२३ चा आयसीसी विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीवर गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली. तरीही, तो अजूनही या दुखापतीमुळे त्रस्त आहे. सामन्यांनंतर तो अनेकदा गुडघ्यावर पट्टी बांधलेला दिसला आहे. यामुळेच तो फलंदाजीसाठी कमी वेळा मैदानात उतरत आहे आणि फलंदाजीच्या क्रमवारीत खूप खालच्या स्थानावर खेळत आहे.

Web Title: Ipl 2026 ms dhoni injured in chennai before ipl starts will not play in opening match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • cricket
  • IPL 2026
  • MS. Dhoni
  • Sports

संबंधित बातम्या

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
1

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
2

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
3

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
4

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.