Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs GT: ‘हा अत्यंत बकवास आणि मूर्खपणाचा प्रश्न आहे…’ का भडकला ग्लेन फिलिप्स, पत्रकार परिषदेत नक्की काय विचारलं

आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा आरसीबीकडून पराभव झाला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे गुजरातचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स संतापला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 27, 2026 | 07:29 PM
ग्लेन फिलिप्स पत्रकारांवर का भडकला (फोटो सौजन्य - X.com)

ग्लेन फिलिप्स पत्रकारांवर का भडकला (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • पत्रकार परिषदेत भडकला ग्लेन फिलिप्स 
  • नक्की काय विचारण्यात आला प्रश्न 
  • गुजरात टायटन्सने गमावला सामना 
आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा आरसीबीकडून पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २५४ धावा केल्या. आरसीबीचा डाव १६२ धावांवर संपुष्टात आला. गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी अनेक चुका केल्या. फिल्डिंग करतानाही अनेक कॅच सोडले गेले. तर फलंदाजही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. 

सामन्यानंतर, गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करणारा ग्लेन फिलिप्स पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. ग्लेन फिलिप्स तर अंतिम ११ खेळाडूंमध्येही नव्हता. मात्र तरीही तो पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. दरम्यान पत्रकार परिषदेदरम्यान, ग्लेन फिलिप्सला एक असा प्रश्न विचारण्यात आला ज्यामुळे त्याचा राग अनावर झाला. भर पत्रकार परिषदेत ग्लेन फिलिप्स पत्रकारावरच भडकला. 

SRH vs RR Eliminator: पॅट कमिन्स वैभव सूर्यवंशीला घाबरला, म्हणाला, ‘त्यासाठी प्लॅन A, B, C तयार आहे…’

गुजरात टायटन्सने हार मानली का?

फलकावर मोठी धावसंख्या पाहून त्यांच्या संघाने मानसिकरित्या हार मानली होती का, असा प्रश्न ग्लेन फिलिप्स यांना विचारण्यात आला. फिलिप्स यांना हा प्रश्न आवडला नाही. त्यांनी लगेच उत्तर दिले, “हा एक मूर्खपणाचा प्रश्न आहे. खरंच खूप मूर्खपणाचा प्रश्न आहे. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आम्ही असे का करू? हा खूपच वाईट प्रश्न आहे. आम्ही मैदानात उतरलो आणि आमचे सर्वस्व पणाला लावले. दुर्दैवाने, जेव्हा तुम्ही २५० धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडायला हवे. सर्व काही जुळून येईल या आशेने आम्ही मैदानात उतरलो होतो, पण तसे झाले नाही.” 

ग्लेन काय म्हणाला 

पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत होऊनही गुजरात टायटन्स संघ लीगच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. ते दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळतील. फिलिप्सच्या मते, मोठा पराभव संघासाठी चांगला असतो.

न्यूझीलंडचा हा अष्टपैलू खेळाडू म्हणाला, “अशा पराभवातून सावरणे कदाचित सोपे असते. जर तुम्ही एक-दोन धावांनी हरलात, तर तुम्ही त्या क्षणाचा विचार करत राहता, ‘असे किंवा तसे झाले असते तर बरे झाले असते’ असे वाटत राहते, पण जेव्हा तुम्ही विजयाच्या जवळपासही नसता, तेव्हा तुम्ही फक्त एवढेच म्हणू शकता की, ‘आज आमचा दिवस नव्हता.’ याचा अर्थ असा नाही की पुढच्या सामन्यात आमचा दिवस चांगला नसेल. अजूनही वेळ गेलेली नाही आणि त्यासाठी नक्कीच संघ पुन्हा नव्याने काम करेल आणि तो दिवस आमचा असेल”

Kagiso Rabada चा ‘रॉकस्टार’ परफॉर्मन्स! ‘हा’ रेकॉर्ड करत क्रिकेटविश्वाला केले थक्क

Web Title: Ipl 2026 qualifier 1 lost by gujarat titans glenn phillips got angry after hearing question from reporter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Glenn Phillips
  • IPL 2026
  • RCB vs GT

संबंधित बातम्या

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
1

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.