GT Vs RCB qualifer 1 live streaming (फोटो- ट्विटर)
आरसीबीने गुजरातला दिले होते 255 रन्सचे टार्गेट
गुजरात टायटन्सने पॉवर प्लेमध्ये गमावल्या 4 विकेट्स
राहुल तेवतियाची अर्धशतकी खेळी
Tata IPL 2026 GT Vs RCB Qualifier 1 Live Updates: आज हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा स्टेडियम आयपीएल 2026 चा पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये प्ले ऑफचा सामना पार पडला. या सामन्यात रजत पाटीदारच्या शानदार खेळीच्या जोरावर बंगळुरूने गुजरात टायटन्सला 255 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात आरसीबीने गुजरातचा 92 रन्सने पराभव केला आहे. आरसीबीने क्वालिफायर 1 जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता गुजरातचा सामना एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाशी 29 तारखेला होणार आहे.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
आरसीबीने दिलेली 255 रन्सचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. हे दोन्ही खेळाडू गुजरातचे प्रमुख फलंदाज होते. या डावात त्यांनी सुरुवात चांगली केली. मात्र मोठ्या भागीदारीत त्याचे रूपांतर करण्यास त्यांना अपयश आले आहे. साई सुदर्शन विचित्र पद्धतीने 14 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार शुभमन गिल केवळ 2 रन्स करून आउट झाला. जेसन होल्डर शून्यावर परतला. जोस बटलरने आल्या आल्या काही मोठे फटके मारले. मात्र 29 वर असताना तो स्टंप आउट झाला. पाठोपाठ निशांत सिंधु 5 वर आउट झाला. राशीद खान 8 रन्स करून आउट झाला. राहुल तेवतियाने गुजरात टायटन्सला एका सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवले. एका बाजूने सिराज आणि दुसऱ्या बाजूने राहुल तेवतियाने चांगली भागीदारी केली. राहुल तेवतिया 68 रन्स करून आउट झाला.
GT Vs RCB Live Scorecard: रजत पाटीदारची खणखणीत खेळी; आरसीबी 250 पार, टायटन्सला विजयासाठी…
आरसीबीची गोलंदाजी
आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्येच गुजरात टायटन्सचे कंबरडे मोडले. जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक विकेट पटकावली. तर रसिख डारने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट्स पटकावत मेडन ओव्हर टाकली. जेकब डफ्रीने एकूण 3 विकेट्स पटकावल्या. भुवनेश्वर कुमारने तेवतियाला आउट केले.
FIFTY DONE! ✅ Rahul Tewatia notches up only his second #TATAIPL half-century 👊💙 Updates ▶️ https://t.co/9rs6u5obOw#Qualifier1 | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/JBs3nf097e — IndianPremierLeague (@IPL) May 26, 2026
आरसीबीची फलंदाजी
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करण्यासाठी आरसीबीला आमंत्रित केले होते. आरसीबीकडून विराट कोहली आणि वेंकटेश अय्यरने डावाची सुरुवात केली. वेंकटेश अय्यरने पहिल्याच ओव्हरमध्ये 13 रन्स केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात अय्यर आउट झाला. त्यानंतर विराट कोहलीची साथ देण्यासाठी देवदत्त पडीकल मैदानात आला. विराट आणि देवदत्तने चांगली भागीदारी केली. कर्णधार रजत पाटीदारने शानदार अर्धशतक लगावले. त्याच्या खेळीमुळे आरसीबीने 200 पेक्षा जास्त रन्स केल्या. कृणाल पंड्या 43 रन्सवर आउट झाला. तर टीम डेव्हिड 4 रन्स करून परतला.
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराज आणि कगीसो रबाडाने चांगली सुरुवात केली. वेंकटेश अय्यरला कगिसो रबाडाने आउट केले. तर जेसन होल्डरने आक्रमक खेळी करणाऱ्या विराट कोहलीला 43 रन्सवर आउट केले. त्यामुळे आरसीबीचा संघ अडचणीत आला. त्यापाठोपाठ होल्डरने देवदत्त पडीकलची विकेट घेतली.
RCB Vs GT Live scorecard: गुजरात टायटन्सने टॉस जिंकला; घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय
आरसीबी संभाव्य टीम: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार.
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा.






