Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : SRH च्या विजयानंतरही Abhishek Sharma ला मोठा झटका! BCCI ची मोठी कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स KKR विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद SRH ने दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अभिषेक शर्मा. मात्र, सामन्यानंतर त्याला बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागलं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 03, 2026 | 01:21 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • KKR विरुद्ध SRH ने दणदणीत विजय मिळवला
  • विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अभिषेक शर्मा
  • सामन्यानंतर त्याला बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागलं
Abhishek Sharma has been fined : कोलकाता नाईट रायडर्स KKR विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद SRH ने दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अभिषेक शर्मा. या सामन्यात त्याने ४८ धावांची स्फोटक खेळी केली. अवघ्या २१ चेंडूंमध्ये साकारलेल्या या खेळीत त्याने ४ षटकार आणि तितकेच चौकार ठोकले. मात्र, सामन्यानंतर त्याला बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागलं.

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI

नेमकं प्रकरण काय?

अभिषेक शर्मावर या सामन्यादरम्यान शिस्तभंगाच्या कारवाई करण्यात आली. सामन्यादरम्यान ‘आयपीएल आचारसंहिते’चे म्हणजेच IPL Code of Conduct चं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात आली आहे. तसेच, त्याच्या खात्यावर एक ‘डिमेरिट पॉइंट’देखील जमा करण्यात आला आहे.

बीसीसीआयनं काय म्हटलं?

अभिषेक शर्मावर हा दंड ठोठावताना, बीसीसीआयने एका अधिकृत निवेदनात स्पष्ट केलं की, “सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा याच्यावर, गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी, त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे.” अभिषेकने आपली चूक कबूल केली. या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले: “त्याने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.३ अंतर्गत Level 1 दर्जाचा गुन्हा केल्याचे मान्य केले आणि Match Referee सुनावलेली शिक्षा स्वीकारली. आचारसंहितेच्या ‘स्तर १’ दर्जाच्या उल्लंघनांच्या बाबतीत, सामना पंचांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.”

अभिषेक शर्माच्या बाद होण्यावरून वाद

९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सीमारेषेच्या जवळ अभिषेक झेलबाद झाला. मात्र, वरुण चक्रवर्तीने तो झेल cleanly पकडला होता की नाही, हे स्पष्ट होत नसल्याने हा निर्णय Third Umpire कडे सोपवण्यात आला. आणि त्याला बाद ठरवण्यात आलं. पण या निर्णयाचा थेट नसला तरी विरोध झाला. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनाही तो झेल वैध नसल्याचे वाटले. अभिषेकही या निर्णयामुळे नाराज असल्याचे दिसून आले.

SRH चा ६५ धावांनी विजय

सनरायझर्स हैदराबाद संघाने गुरुवारी आयपीएल २०२६ हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करताना, संघाने २२६ धावांचा विशाल डोंगर उभारला; प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १६१ धावांवरच गारद झाला. २४ चेंडूंमध्ये ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारण्यासह, आपल्या २ षटकांत २ बळी घेतल्याबद्दल नितीश कुमार रेड्डीला Player of the Match देण्यात आलं.

मलिंगाने हात न लावताच केले Run Out, रघुवंशीच्या चुकीने गेला Cameron Green चा बळी

Web Title: Ipl 2026 srh opener abhishek sharma has been fined 25 per cent of his match fees know why marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL
  • IPL 2026
  • KKR
  • KKR vs SRH
  • SRH

संबंधित बातम्या

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज
1

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस
2

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.