Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला कोणी सांगितलंच नाही…’ वैभव सूर्यवंशीने केला धक्कादायक खुलासा, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला आणि माहीतच नाही

राजस्थान रॉयल्सचा स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या क्वालिफायर २ मध्ये आपल्या संघाला पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वात जलद शतकाच्या संधीची त्याला कल्पना नव्हती.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 28, 2026 | 10:32 AM
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीच्या साधेपणाने जिंकले प्रेक्षकांचे मन 
  • वैभवला ख्रिस गेलच्या शतकांच्या रेकॉर्डची नव्हती कल्पना 
  • मॅन ऑफ द मॅचच्या वेळी केला खुलासा 
इंडियन प्रीमियर लीगमध्ये, वैभव सूर्यवंशीने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार फलंदाजी केली, पण एक मोठा विक्रम मोडण्याची संधी हुकली. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याची संधी त्याला मिळाली होती. ख्रिस गेलने हा पराक्रम ३० चेंडूंमध्ये केला होता. वैभव सूर्यवंशी २९ चेंडूंमध्ये ९७ धावा करून बाद झाला. सामन्यानंतर त्याने स्पष्ट केले की, फलंदाजी करताना त्याला या विक्रमाची कल्पना नव्हती. 

वैभव सूर्यवंशी म्हणजे एक Wonder Kid आहे असंच मानलं जातं. याशिवाय त्याला Universe Baby असंही नाव दिलं गेलंय. हैदराबाद विरूद्ध सामन्यात सर्व प्लॅन्स अपयशी ठरवत हैदराबादच्या सर्व गोलंदाजांच्या तोंडचं पाणी वैभवने पळवलं होतं. त्याचा एक विक्रम केवळ ३ धावांसाठी राहिला. त्याने याच सामन्यात सर्वाधिक सिक्सरचा ख्रिस गेलचा विक्रम मात्र तोडला होता. मात्र याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं त्यानं सांगितलं. 

SRH vs RR Eliminator: वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी मोडला द ग्रेट ‘ख्रिस गेल’चा रेकॉर्ड, ठरला सर्वात तरूण खेळाडू

सकारात्मकता महत्त्वाची 

“आम्ही जिंकलो आहोत, त्यामुळे आता आम्हाला सकारात्मक मानसिकतेने पुढे जायचे आहे. मी फलंदाजी करताना थोडा विचार करतो, खूप जास्त नाही. मी गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करतो, फक्त गोलंदाजांचा विचार करतो आणि त्यांच्याविरुद्ध कोणती रणनीती आखता येईल याचा विचार करतो.

मी सकारात्मक मानसिकतेने खेळतो आणि गोलंदाजांवर दबाव टाकतो. गोलंदाजांवर दबाव टाकणे हेच माझे ध्येय आहे. संघासाठी योगदान देण्यावर माझे लक्ष होते. आता माझे लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर आहे. माझ्यात काही कमतरता असतील, तर मी त्यावर काम करतो आणि माझ्या खेळाचा तो पैलू सुधारण्याचा प्रयत्न करतो.” असे अत्यंत साधेपणाने वैभवने प्रेझेंटेशनच्या वेळी सांगितले. 

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…

विक्रमाची कल्पना नव्हती

वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडण्यापासून थोडक्यात चुकला. तो म्हणाला, “मला याची कल्पना नव्हती. मी बाद होऊन मैदान सोडल्यावरच मला याबद्दल कळले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारण्याचा माझा हेतू होता. मी जेव्हाही खेळतो, तेव्हा फक्त संघाच्या विजयासाठीच फलंदाजी करतो. सध्या लक्ष्य फक्त ट्रॉफी मिळवणं हेच आहे” असंही त्याने नम्रपणाने सांगितले. सध्या चारही बाजूने वैभवची प्रशंसा होत आहे आणि अगदी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही वैभवचे भरभरून कौतुक केले आहे. दरम्यान आता गुजरात टायटन्सविरूद्ध वैभव कशी खेळी करणार हे पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Ipl 2026 vaibhav sooryavanshi did not know about record break of chris gayle told after getting man of the match player award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
1

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.