Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Royals च्या यशस्वी जयस्वालने केला मोठा रेकॉर्ड, पूर्ण केले 6 चे अनोखे शतक; ठरला चौथा मानकरी

यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूंमध्ये ७७ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने राजस्थान रॉयल्ससाठी एक मोठा आयपीएल विक्रम रचला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 08, 2026 | 11:29 AM
यशस्वी जयस्वालचा नवा विक्रम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

यशस्वी जयस्वालचा नवा विक्रम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • यशस्वी जयस्वालचा राजस्थान रॉयलसाठी मोठा विक्रम 
  • हा विक्रम करणारा चौथा फलंदाज 
  • मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामान्यात केला विक्रम 
यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांची उधळण केली. पावसामुळे बाधित झालेला हा सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला आणि नाणेफेक हरल्यानंतर राजस्थानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशीसोबत सलामी देताना, यशस्वीने पहिल्याच चेंडूपासून स्फोटक खेळी सुरू केली आणि गोलंदाजांची धुलाई केली. यशस्वीने केवळ ३२ चेंडूंचा सामना केला आणि ७७ धावांवर नाबाद राहिला. २४० च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या त्याच्या या शानदार खेळीत १० चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. यासोबतच, यशस्वीने एक मोठा विक्रमही रचला.

यशस्वीने राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये १०० षटकारांचा टप्पा गाठला आहे. आयपीएलमध्ये या फ्रँचायझीसाठी १०० षटकार पूर्ण करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी शेन वॉटसन, जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी हा पराक्रम केला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक षटकारांचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर आहे. सॅमसनने १९२ षटकार मारले आहेत. जोस बटलर १३५ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, वॉटसनने या फ्रँचायझीकडून खेळताना १०९ षटकार मारले आहेत.

RR vs MI: पराभव लागला हार्दिक पंड्याच्या जिव्हारी! म्हणाला, ‘त्यांनी तर आम्हाला…’, फोडले बॉलर्सवर खापर

राजस्थान रॉयल्सची वादळी सुरुवात

गुवाहाटीमध्ये पाऊस आणि ओल्या मैदानामुळे विलंब झाल्यानंतर, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना अखेर रात्री १०:१० वाजता सुरू झाला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला. राजस्थानचे दोन डावखुरे सलामीवीर, यशस्वी जयस्वाल आणि युवा वैभव सूर्यवंशी यांनी मैदानात उतरताच चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. 

दोघांनी मिळून अवघ्या पाच षटकांत ८० धावांची स्फोटक भागीदारी केली. १५ वर्षीय वैभवने अवघ्या १४ चेंडूंमध्ये एक चौकार आणि पाच षटकारांसह ३९ धावा ठोकल्या. शार्दुल ठाकूरने त्याला बाद करून ही भागीदारी तोडली. वैभव बाद झाल्यानंतर राजस्थानच्या काही विकेट्स झटपट पडल्या. ध्रुव जुरेलला अल्लाह गझनफरने अवघ्या २ धावांवर बाद केले. कर्णधार परागने १० चेंडूंमध्ये २० धावा केल्या, पण गझनफरने त्याचा दुसरा बळी घेतला.

MI Vs RR Pitch Report: मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅचवर पावसाचे सावट? पहा पीच रिपोर्ट

जयस्वालने ऑरेंज कॅपवर नाव कोरले

एका बाजूने विकेट्स पडत होत्या, पण यशस्वी जयस्वालची बॅट अजेय राहिली. त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत २३ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. ७७ धावांच्या नाबाद खेळीसह जैस्वालने या मोसमातील सर्वाधिक धावा करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या समीर रिझवीला मागे टाकत ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले. त्याने तीन सामन्यांमध्ये १७० धावा केल्या आहेत, तर समीर रिझवीने दोन सामन्यांमध्ये १६० धावा केल्या आहेत.

Web Title: Ipl 2026 yashasvi jaiwal completed century of sixes for rajasthan royals against mumbai indians becomes fourth player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
1

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
2

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य
3

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
4

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.