हार्दिक पांड्या भडकला, बॉलर्सवर फोडले पराभवाचे खापर (फोटो सौजन्य - Instagram)
पावसामुळे सामन्याची सुरुवात दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबवण्यात आली होती. पांड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला. सामनावीर यशस्वी जैस्वाल (३२ चेंडूत ७७ धावा) आणि वैभव सूर्यवंशी (१४ चेंडूंत ३९ धावा) यांनी मुंबईच्या गोलंदाजांना जोरदार झोडपले आणि सामना राजस्थानच्या खिशात घातला.
MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव
सामन्यानंतरच्या सादरीकरणात पांड्या काय म्हणाला?
पॉवरप्लेमध्ये आम्ही जसे चेंडू टाकायला हवे होते तसे टाकले नाहीत. राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर चांगले खेळले. गोलंदाजांनी जबाबदारी घेतली पाहिजे. एक गोलंदाजी गट म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली नाही. मी या पराभवासाठी फलंदाजीला दोष देणार नाही. गोलंदाजी विभागाने जबाबदारी घ्यायला हवी होती. नेहमी चांगले चेंडू टाकणे महत्त्वाचे असते. जर आम्ही व्यवस्थित गोलंदाजी केली असती, तर आम्ही सामन्यात टिकून राहिलो असतो.
पांड्याने वैभव सूर्यवंशीचे भरभरून कौतुक केले
सूर्यवंशीबद्दल बोलताना पांड्या म्हणाला, “१५-१६ वर्षांचा मुलगा अशाप्रकारे खेळतो हे खूपच रंजक आहे. त्याची फलंदाजी आणि निर्भयता पाहून खूप आनंद होतो. त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.” पुढील सामन्याबद्दल बोलताना पांड्या म्हणाला, “आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायला हवे. उद्याची सकाळ पुन्हा येईल, सूर्य उगवेल, आपल्याला पुढील सामन्यासाठी चांगली तयारी करावी लागेल.”
नुसता जाळ अन् धूर निघणार! RR च्या ‘वैभवा’ला MI चा Jaspreet Bumrah सुरुंग लावणार? कोण ठरणार किंग?
राजस्थान गुणतालिकेत अव्वल स्थानी
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, जैस्वाल-सूर्यवंशी ही जोडी स्पर्धेतील सर्वोत्तम सलामीची जोडी आहे. तो म्हणाला, “दोघांनाही वयाचा फायदा आहे. वैभव अप्रतिम आहे. जयस्वाल गेल्या ३-४ वर्षांपासून हे करत आहे. त्याच्याकडे कौशल्य आणि परिपक्वता आहे. तो सर्वोत्तम आहे.” नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने ११ षटकांत तीन गडी गमावून १५० धावा केल्या आणि त्यानंतर मुंबईला १२३/९ धावांवर रोखले. या २७ धावांच्या विजयासह राजस्थानने आपला सलग तिसरा सामना जिंकला आणि सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.






