मूल न झाल्याने नवऱ्याचा जाच (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
या स्त्री ने आपलं दुःख व्यक्त केलं आणि आपला नवराही या गोष्टीमुळे खूपच दुःखी असल्याचे सांगितलं. या महिलेचे दुःख ऐकून घेतल्यानंतर अनिरूद्ध महाराजांनी जे उत्तर दिलं आणि तिच्या नवऱ्याला जो सल्ला दिला तो सर्वांनी समजून घ्यायला हवा. कुटुंब म्हणजे नक्की काय आणि कसं सांभाळायचं यासाठी हे उत्तर नक्कीच डोळे उघडणारं आहे.
अनिरुद्ध महाराजांच्या सभेला एक दुःखी महिला पोहचली होती आणि तिने आपलं दुःख सर्वांसमोर व्यक्त केलं. ‘मला मूल नाही आणि यामुळे माझा नवराही माझ्यावर सतत चिडलेला असतो आणि मला टोमणे मारतो’ यावर अनिरुद्ध महाराजांनी उत्तर दिलं, ‘मी आहे तुझा मुलगा’, यावर महिलेने म्हटलं की, तिला कळतंय पण तरीही ती दुःखी आहे. तिने सांगितलं की, ‘२०२१ मध्ये मी IVF करून घेतलं आणि त्यावेळी मी गरोदरदेखील होते. पण त्यावेळी कोविडचा खराब काळ चालू होता आणि तिच्या बाळाचं यामध्ये निधन झालं. कमतरता तर माझ्यातच आहे. आता तर माझा मेनोपॉज चालू झाला आहे’
महिलने पुढे म्हटलं की, ‘महाराज तुम्ही मला समजावले होते की, ज्यांना मूल नसते, त्यांच्यासाठी देव काहीतरी चांगलंच करत असतो. जसं मीराबाईला मूल नव्हतं. मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी समजून घेऊ शकते पण माझा नवरा मात्र नाही समजून घेत. या कारणामुळे माझ्यापासून दूर राहतो.’ हे ऐकून अनिरुद्ध महाराजांनी सांगितलं की, ‘नवऱ्याला घेऊन ये, मी त्याला समजावून सांगेन’
ही परिस्थिती पाहिली तर हे समजून येतं की, मूल न झाल्यामुळे वा गरोदर न राहिल्यामुळे अनेक जोड्यांमध्ये ताणतणाव आणि भांडणं असल्याचे दिसून येते. अनेकदा या स्थितीत पती-पत्नी एकमेकांना दूषणं देतात. यामुळे नात्यात खूपच दुरावा येऊ लागतो. अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे आणि कठीण काळात एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. मूल होणं न होणं हे नक्कीच आपल्या हातात नाही. पण एकमेकांना समजून साथ देणं हे मात्र आपल्या हातात आहे. मूल होणं हेच जीवनाचं सार्थक नाही तर नातं टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे.
लग्नानंतरही मूल होत नाही का? 100 पैकी 10 जण ‘या’ आजाराने ग्रस्त, ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!






