सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ‘बनपाव आणि त्याचा आका’ करत असल्याचा आरोप जावळकर यांनी केला. बनपावला भाजपने समज द्यावी. हा बनपाव रोज मोक्काट सुटलेला आहे. हा बनपाव शिवसेनेवर बोलत राहिला तर जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा जावळकरांनी दिला.
नेतृत्व मोठे होत असल्याने काहींच्या पोटात दुखते
अनिकेत जावळकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मोठे होत असल्याने काही लोकांच्या पोटात दुखत आहे. एखादा मराठी नेता मोठ्या उंचीवर पोहोचत असेल किंवा पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने वाटचाल करत असेल, तर त्याला कसे रोखता येईल, त्याचे नेतृत्व कसे दाबता येईल, यासाठी काही जणांकडून राजकारण केले जात आहे. पूर्णेकर प्रकरण असो किंवा जरांगे पाटील यांच्याशी संबंधित विषय, या घटनांच्या माध्यमातून शिंदे साहेबांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘प्रतिमा मलीन करण्याचे राजकारण करू नका’
पुढे बोलताना जावळकर यांनी नवनाथ बन यांना सुनावले की, स्वतःच्या कामातून नेतृत्व निर्माण करा. दुसऱ्याची प्रतिमा मलीन करून किंवा त्याचे नेतृत्व संपवून मोठे होण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारचे राजकारण यापुढे खपवून घेतले जाणार नाही. आगामी काळात आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास तयार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
‘शिवसैनिक आणि युवासैनिक शिंदे साहेबांच्या पाठीशी’
एकनाथ शिंदे हेच आगामी काळात मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत जावळकर म्हणाले की, त्यांच्या पाठीशी शिवभक्त, हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ठामपणे उभ्या आहेत. अहोरात्र, अगदी मध्यरात्रीसुद्धा शिंदे साहेबांसोबत काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही कोणाचे नेतृत्व दाबण्यासाठी किंवा कोणाला संपवण्यासाठी राजकारण करत नाही. आम्ही कर्तृत्वाच्या मागे उभे राहणारे लोक आहोत, असे स्पष्ट करत अनिकेत जावळकर यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
Ans: युवा सेनेचे राज्य समन्वयक अनिकेत जावळकर यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर टीका केली आहे.
Ans: पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने साथ न दिल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला होता.
Ans: शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही. आगामी काळात अशा प्रयत्नांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जावळकर यांनी दिला.






