Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Ipl 2027 : भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांची चेन्नई सुपर किंग्जने आपल्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. संघ व्यवस्थापनेतील त्यांच्या प्रवेशामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघात नवचैतन्य निर्माण होऊ शकते.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 21, 2026 | 08:12 PM
Ipl 2027 : 'थलायवा' धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Ipl 2027 : 'थलायवा' धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Follow Us
Follow Us:
  • सीएसकेच्या कामगिरीत सुधारणा करण्याची जबाबदारी
  • आयपीएलमधील गोलंदाजीत उत्तुंग कामगिरी
  • झहीर यांना प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
 

इंडियन प्रीमियर सुपर लीग (Ipl 2027) मधील पाच वेळचा विजेत्या असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)ने सोमवारी भाकरी फिरवली. सीएसकेच्या व्यवस्थापनाने मागील 18 हंगाम आपल्यासोबत असलेल्या स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी भारताचे माजी डावखुरे वेगवान गोलंदाज झहीर खान यांना आपले नवे मुख्य प्रशिक्षक घोषित केले आहे.

सलग तिसऱ्यांदा ‘थलायवा’ महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ हा आयपीएलमधील प्लेऑफ गाठू शकला नाही. यामुळे फ्लेमिंग यांना आपले पद सोडावे लागले. सीएसकेने सोमवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले, ज्यात झहीर खान यांचे वक्तव्य आहे. त्यात झहीर म्हणतात की, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या संघाचा भाग बनणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.
एका क्रिकेटपटूच्या रुपात मैदानात सीएसकेचा सामना करताना मी खूप आनंद घेतला आहे. चेपॅकमध्ये सुपरफॅन्सद्वारे निर्माण करण्यात येणारे वातावरण खूप खास असते. मी या शानदार इतिहास असलेल्या प्रतिष्ठीत फ्रँचायजीसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

आयपीएलमधील गोलंदाजीत उत्तुंग कामगिरी

आपल्या शानदार 14 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीर खान यांनी भारतासाठी 92 कसोटी सामन्यात 311 विकेट प्राप्त केलेत, तर 200 वनडे सामन्यात त्यांनी एकूण 282 विकेट आपल्या खात्यात जमा केलेत. या दिग्गज गोलंदाजाने भारतासाठी 17 -टी 20 सामने खेळताना आपल्या नावे 17 विकेटची नोंद केली आहे.
आयपीएलमध्येही त्यांची कामगिरी उत्तुंग अशीच राहिली आहे. आयपीएलच्या कारकिर्दीत तीन (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स) वेगवेगळ्या संघांकडून खेळताना त्यांनी 100 सामन्यात 102 गडी बाद केले आहेत.

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

झहीर यांना प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

वनडे विश्वचषक 2011 मध्ये भारताला जेतेपद मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे झहीर हे चेन्नई सुपर किंग्जच्या गटात आपले रणनीतिक नियोजन आणि प्रशिक्षणाचा अनुभव घेऊन येत आहेत. आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससोबत मेंटॉरची भूमिका बजावण्याआधी ते मुंबई इंडियन्समध्ये क्रिकेट ऑपरेशन्सच्या डायरेक्टर आणि ग्लोबल डेव्हलपमेंटचे हेड राहिलेले आहेत.

झहीर यांनी यावर्षाच्या सुरुवातीला बंगळुरूमध्ये बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस (सीईओ)मध्ये इंडिया ‘ए’, अंडर-19 आणि निवडण्यात आलेल्या खेळाडूंसाठी फास्ट बॉलिंग कॅम्पही चालवला होता. फ्लेमिंग यांनी सीएसके सोडल्यानंतर व अनेक उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर झहीर यांची निवड करण्यात आली आहे.
असे सांगण्यात येत आहे की, चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय परिस्थिती व स्थानिक खेळाडूंची समझ पाहता मुख्य प्रशिक्षक हा भारतीय असावा यावर जोर दिला होता.

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

Web Title: Ipl 2027 zahir khan csk new head coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2027
  • mumbai indians

संबंधित बातम्या

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली
1

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
2

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव
3

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.