IPL 2025 : जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करणार असल्याने मुंबईची ताकद वाढली आहे. जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रातही सहभागी झाला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह संघात सहभागी झाल्याने मुंबईसाठी ही चांगली बातमी मानली जात आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सराव सत्रात बूमराहने भाग घेतला. यावेळी बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे.हे मुंबई संघासाठी सकारात्मक मानले जात आहे.
बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर पहिल्यांदाच जोरात गोलंदाजी करताना दिसून आला आहे. मुंबई इंडियन्सकडून बुमराहच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह आपल्या यॉर्करने फलंदाजांची भंबेरी उडवताना दिसून आला. तसेच बुमराहच्या एका यॉर्करचा बचाव करताना एक फलंदाज खाली पडला आणि चेंडू थेट विकेटवर जावून आदळला. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत 133 आयपीएल सामने खेळेल आहेत. त्या कालावधीत 165 बळी मिळवले आहेत. जसप्रीत बुमराह 2013 मध्ये मुंबई संघात सामील झाला होता. तेव्हाच त्याचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले होते. तेव्हापासून तो याच एका संघाचा एक भाग राहिला आहे. बुमराहला यावर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापत झाली होती. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करत आहे. जसप्रीत बुमराह मैदानावर पाऊल ठेवताच मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड याने त्याला खांद्यावर उचलून घेतले. बूमराह डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरसोबत सराव करताना दिसून आला. नंतर आपल्या खास शैलीत फलंदाजांना त्रास दिला.
Goodnight Paltan! 😊#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/UYghtBvYMN
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2025
आज म्हणजेच सोमवार रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात बूमराह उपस्थिती राहण्याच्या बातमीने बूमराहचे लाखो चाहते देखील आनंदित होणार आहेत. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला. आता जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना बुमराह दिसून येणार आहे. इंग्लंडच्या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी बुमराह आयपीएलमध्ये आपल्या फिटनेस चाचणी घेण्यास उत्सुक असणार आहे.
हेही वाचा : RCB vs MI : मुंबईच्या फलंदाजांचा लागणार कस! आज वानखेडेवर आरसीबीविरुद्ध भिडणार
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंज, रायन रिकेल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, टिळक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, विघ्नेश पुथुर, राज अंगद बावा, कॉर्बिन बॉश, दीप शर्मा, ट्रेंट कुमार, अरविंद कुमार, टोपली, व्हीएस पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसा जसप्रीत
बुमराहनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, स्वस्तिक चिकारा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मनोज भंडागे, जेकब बेथेल, जोशवुद शर्मा, जोशलवूड शर्मा, रौशलेम, शुक्लवूड, रेशम शर्मा कुमार, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, यश दयाल.