मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
SRH vs GT : आयपीएल 2025 चा 18 चा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. गुणतालिकेत देखील मोठे चढउतार बघायला मिळत आहेत. अशातच सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल रविवारी(6 एप्रिल ) सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यापूर्वी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेलला हैद्राबाद संघ 152 धावा करू शकला. प्रतिउत्तरात जीटी संघाने 16.4 ओव्हरमध्येच लक्ष्य गाठले. या सामन्यात जीटी संघाच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजांनी केली. मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजांनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा स्पेल सर्वात घातक ठरला.
जीटीच्या संघाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वाधिक विकेट घेत आपली छाप पाडली आहे. त्याने हैदराबादच्या महत्वाच्या 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. या सोबतच मोहम्मद सिराजने आयपीएलच्या इतिहासात एक नवा विक्रमही नोंदवला आहे. मोहम्मद सिराजने हैदराबादविरुद्ध 4 गडी बाद करत आयपीएलमध्ये 100 बळींचा टप्पा पूर्ण केला.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सिराजने हैदराबादचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला बाद केले. तेव्हा तो त्याचा 100 वा बळी ठरला आहे. त्याआधी सिराजने एसआरएचचा सलामीवीर फलंदाज ट्रेव्हर हेडला त्याने बाद केले. नंतर त्याने अभिषेक आणि अनिकेत वर्मा आणि सिमरजीत सिंगला यांना माघारी पाठवले.
हेही वाचा :RCB vs MI : मुंबईच्या फलंदाजांचा लागणार कस! आज वानखेडेवर आरसीबीविरुद्ध भिडणार
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सिराज आजवर आयपीएलमध्ये एकूण 97 सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने 29 च्या सरासरीने आणि 8.60 च्या इकॉनॉमीने त्याने 102 बळी घेतले आहेत. या काळात सिराजची सर्वोत्तम आकडेवारी म्हणजे 17 धावांत 4 बळी राहिली आहे. आयपीएल 2024 मध्ये मोहम्मद सिराज हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. मात्र यावर्षी त्याला आरसीबीने सोडले. आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळताना सिराजने 14 सामन्यांत 33.70 च्या सरासरीने 15 विकेट मिळवल्या होत्या.
गुजरात टायटन्स संघ : ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी.
सनरायझर्स हैदराबाद संघ : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, रवी श्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा.