Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

9 धावांचा खेळ अन् विश्वविक्रम! लॉर्ड्सवर Joe Root मैदानात उतरताच इतिहास बदलला; पाँटिंगचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला, आता सचिनचा नंबर?

Joe Root breaks Ponting world record most runs home ground: लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मायदेशात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनून एक नवीन विश्वविक्रम रचला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 29, 2026 | 01:51 PM
Joe Root breaks Ponting world record

Joe Root breaks Ponting world record

Follow Us
Follow Us:
  • जो रूटचा मोठा विक्रम
  • मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
  • रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड मोडला
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात, इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूटने आपल्या २४ धावांच्या खेळीने एक विश्वविक्रम रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने सातत्याने अनेक नवीन विक्रम रचणारा जो रूट आता कसोटी इतिहासात मायदेशात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर होता. आता रूटने त्याला मागे टाकून पहिले स्थान पटकावले आहे. तसेच, जो रूटने एका विशेष विक्रमांच्या यादीत रिकी पाँटिंगची बरोबरी केली .

बुद्धिबळाच्या पटावर R Praggnanandhaa चा डंका! Grand Chess Tour जिंकणारा पहिला भारतीय

घरच्या मैदानावर रूटची विक्रमी कामगिरी

लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेव्हा जो रूट फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याच्याकडे एक मोठा विक्रम मोडण्याची संधी होती. त्याला रिकी पाँटिंगला मागे टाकण्यासाठी फक्त नऊ धावांची गरज होती. रुटने ९ धावा करताच हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. जो रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. रूटने इंग्लंडमध्ये ८९ सामन्यांतील १५६ डावांमध्ये ७,५९४ धावा केल्या आहेत .यामध्ये २४ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियात ९२ कसोटी सामन्यांतील १५४ डावांमध्ये ७,५७८ धावा केल्या आहेत.

पाकिसत्नाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रुटची बॅट चालली नाही. त्याने १३ चेंडूमध्ये फक्त ४धावा केल्या. मोहम्मद अब्बासने त्याला एलबीडबल्यू केले. दुसऱ्या डावात रुट मोठी खेळी करेल अशी अपेक्षी होती परंतु तो ३७ चेंडूवर २४ धावा करुन पव्हेलियमनध्ये परतला.

घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • जो रूट – इंग्लंड – ७५९४ धावा
  • रिकी पाँटिंग -ऑस्ट्रेलिया – ७५७८ धावा
  • सचिन तेंडुलकर -भारत – ७२१६ धावा
  • महेला जयवर्धने -श्रीलंका – ७१६७ धावा
  • जॅक कॅलिस -दक्षिण आफ्रिका – ७०३५ धावा

रुटची सचिनच्या विश्वविक्रमासोबत बरोबरी

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत जो रूट सध्या भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. दोघांच्याही नावावर ६८ अर्धशतके आहेत. ९ सप्टेंबरपासून एड्जबॅस्टन स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात जर रूटने अर्धशतक झळकावले, तर तो हा विश्वविक्रम आपल्या नावावर करेल.

अरे यांना कोण ट्रेनिंग देते की नाही? विकेट सोडा, पाकड्यांना बॉलही नीट टाकता येईना, पहा ‘हा’ गालिच्छ रेकॉर्ड

Web Title: Joe root breaks ricky ponting record most test runs home ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • England cricket
  • Joe Root
  • Pakistan Cricket team

संबंधित बातम्या

अरे यांना कोण ट्रेनिंग देते की नाही? विकेट सोडा, पाकड्यांना बॉलही नीट टाकता येईना, पहा ‘हा’ गालिच्छ रेकॉर्ड
1

अरे यांना कोण ट्रेनिंग देते की नाही? विकेट सोडा, पाकड्यांना बॉलही नीट टाकता येईना, पहा ‘हा’ गालिच्छ रेकॉर्ड

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार
2

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘या’ स्टार गोलंदाजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नाइट क्लबबाहेर नेमकं काय घडलं? Video Viral
3

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘या’ स्टार गोलंदाजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नाइट क्लबबाहेर नेमकं काय घडलं? Video Viral

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम
4

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.