भारताचा झिम्बाब्वेसमोर 353 धावांचा डोंगर(फोटो-सोशल मीडिया)
India has set a target of 353 runs for Zimbabwe : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये आज भारत १९ वर्षांखालील संघ आणि झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघ आमनेसामने आले आहेत. बुलावायो येथे खेळल्या जात असेलल्या या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत विहान मल्होत्राच्या नाबाद शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३५२ धावांचा डोंगर उभा केला आहे. झिम्बाब्वेला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर ३५३ धावा कराव्या लागणार आहेत. झिम्बाब्वेकडून ततेंडा चिमुगोरोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने या सामन्यात चांगली सुरुवात केली. आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी यांनी संघाला ४.१ षटकातच ४४ धावांची सलामी दिली. दरम्यान, आरोन जॉर्ज २३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत डाव सावरला. या दोघांनी ६६ धावा जोडल्या. आयुष म्हात्रे २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी अर्धशतक करून माघारी परतला. तसेच वेदांत त्रिपाठी १५ धावा करून बाद झाला. भारताच्या १३० धावांवर ४ विकेट्स गेल्या होत्या.
Innings Break! Vihaan Malhotra’s brilliant century leads India U19’s charge against Zimbabwe U19 in the Super Six clash 💯👊 Over to our bowlers as we defend 3⃣5⃣2⃣ runs 🎯 Scorecard ▶️https://t.co/juFENSDomr #U19WorldCup pic.twitter.com/f4YB9ulNkB — BCCI (@BCCI) January 27, 2026
त्यानंतर विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांनी डाव सावरत ११३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. अभिज्ञान कुंडू अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ६२ चेंडूत ६१ धावा केल्या. या दरम्यान, त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तथापि, विहान मल्होत्रा शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने त्याचे शतक पूर्ण केले. खिलन पटेलने १२ चेंडूत ३० धावांची खेळी केल्यामुळे भारताला ३५० धावांचा टप्पा पार करता आला. विहानने १०७ चेंडूत नाबाद १०९ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार लगावले. झिम्बाब्वेकडून ततेंडा चिमुगोरोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर सिम्बराशे मुडझेनगेरे आणि पानशे माझाई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ध्रुव पटेलला एक विकेट मिळाली.
𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗 💯 Vihaan Malhotra rises to the occasion with a well-structured knock 👏 👏 Scorecard ▶️https://t.co/juFENSDomr #U19WorldCup pic.twitter.com/sL1ozP7asg — BCCI (@BCCI) January 27, 2026
झिम्बाब्वे अंडर-19 प्लेइंग 11: नॅथॅनियल हलाबांगना (यष्टीरक्षक), ताकुडझ्वा माकोनी, कियान ब्लिग्नॉट, वेबस्टर मधिधी, ध्रुव पटेल, लिरॉय चिवौला, सिम्बराशे मुडझेनगेरे (कर्णधार), ब्रँडन सेन्झेरे, मायकेल ब्लिग्नॉट, तातेंडा चिमुगोरो, पानशे माझाई
भारत अंडर-19 प्लेइंग 11: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, कनिष्क चौहान, आरएस अम्ब्रिस, खिलन पटेल, हेनिल पटेल, उद्धव मोहन.






