
'I have seen players getting out on a score of 90...' Nat Sciver-Brunt, the record-breaking centurion in the WPL, expressed her feelings.
Statement by record-breaking centurion Nat Sciver-Brunt : मुंबई इंडियन्सची स्टार अष्टपैलू नॅट सायव्हर-ब्रंटने महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये इतिहास घडवला आहे. काल वडोदरा येथील कोटाम्बी येथील BCA स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या १६ व्या सामन्यात, सायव्हर-ब्रंटने WPL इतिहासातील पहिले शतक ठोकले. तिच्या शतकी खेळीने मुंबई इंडियन्सने आरसीबीचा १५ धावांनी पराभव केला. सायव्हर-ब्रंटच्या खेळीने सामन्याचे वळण बदळवण्याबरोबर WPL मध्ये इतिहासात लिहिला आहे.
शतक पूर्ण केल्यानंतर, नॅट सायव्हर-ब्रंटने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, तिने ९० च्या स्कोअरवर अनेक फलंदाज बाद होताना पाहिले आहेत. त्यामुळे ती अशीच चूक करण्यापासून वाचत होती. तिचे संपूर्ण लक्ष संघासाठी शक्य तितक्या धावा उभ्या करण्यावर होते. संघाने गाठलेल्या धावसंख्येबद्दल नॅट सायव्हर-ब्रंटने समाधान व्यक्त केले. यावेळी तिने विनोदाने असे देखील म्हटले की, कॅथरीन कदाचित हा सामना पाहत असावी, परंतु ती अनेकदा खूप घाबरून पाहते, म्हणून ती हा क्षण चुकवण्याची शक्यता आहे. सिव्हर-ब्रंटने स्पष्ट केले की हे तिच्या कारकिर्दीतील पहिले टी-२० शतक होते आणि ही कामगिरी तिच्यासाठी खूप खास राहिले आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर असे पुनरागमन करणे ही गोष्ट नक्कीच सोपी नसल्याचे सिव्हर-ब्रंटने सांगितले. मॅथ्यूजने दबावाखाली शानदार फलंदाजी करत संघाला मजबूत स्थितीत आणण्यात मोठी भूमिका निभावली. सिव्हर-ब्रंट म्हणाली की तिच्यासोबत फलंदाजी करणे नेहमीच एक चांगला अनुभव राहीला आहे. सामन्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की संध्याकाळच्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणे सोपे नसते, त्यामुळे बोर्डवर मोठी धावसंख्या उभारणे महत्त्वाचे असते.
नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांनी १३१ धावांची विक्रमी भागीदारी रचली आहे. WPL इतिहासातील ही सर्वोत्तम शतकी भागीदारींपैकी एक ठरली आहे. या भागीदारीने मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार मिळाला आणि संघ बळकट स्थितीमध्ये पोहचला आणि संघाला विजय मिळवता आला.
महिला प्रीमियर लीग २०२६ च्या १६ व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत, मुंबई इंडियन्सने २० षटकांत ४ गडी गमावून १९९ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, बंगळुरूने २० षटकांत ९ गडी गमावून १८४ धावा केल्या. परिणामी, मुंबईने हा रोमांचक सामना १५ धावांनी आपल्या खिशात टाकला.