Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Josh Hazlewood ने आफ्रिकन फलंदाजांना रडवलं! भेदक गोलंदाजीने Brett Lee ला पछाडलं; कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

Josh Hazlewood surpassed Brett Lee in Test wicket: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डर्बन कसोटीत आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना रडवले. यासोबतच, त्याने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट लीचा रेकॉर्ड मोडला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 14, 2026 | 02:43 PM
Josh Hazlewood surpassed Brett Lee in Test

Josh Hazlewood surpassed Brett Lee in Test

Follow Us
Follow Us:
  • जोश हेजलवूडचा भेदक मारा
  • दक्षिण आफ्रिकेला गुडघे टेकायला लावले
  • ब्रेट लीचा विक्रम मोडला
Aus vs Sa Test: ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इतिहास रचला आहे. डर्बन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी, जोश हेझलवूडने आपल्या गोलंदाजीने कहर केला. त्याने दक्षिण आफ्रिकेत्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४२१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात केवळ २०६ धावांवर गारद झाला. जोश हेझलवूडने ६ फलंदाजांच्या पव्हेलियनचा रस्ता दाखवत आफ्रिकन संघाला एकहाती गुंडाळलं. या जबरदस्त स्पेलसह हेझलवूडने संघाला विजय मिळवून दिला. यासह, त्याने ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला मागे टाकले आहे. (Josh Hazlewood surpassed Brett Lee in Test wicket)

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा ट्विस्ट! रोहित शर्मा कर्णधार होणार? MI ने केला मोठा खुलासा

डर्बन कसोटीत जोशने घातला धुमाकूळ

९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान डर्बनमधील किंग्समीड येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत हेझलवूडने उत्कृष्ट कामगिरी केली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने हा सामना २१४ धावांनी जिंकला. हेझलवूडने पहिल्या डावात दोन विकेट्स घेतले. यानंतर, त्याने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले. हेझलवूडने दुसऱ्या डावात १६.५ षटके गोलंदाजी करत केवळ ४९ धावा दिल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

कसोटी क्रिकेटमध्ये ब्रेट लीला टाकलं मागे

दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेत हेझलवूडने कसोटी क्रिकेटमध्ये ३११ विकेट्सचा टप्पा गाठला. त्याने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये ३१० विकेट्स घेणाऱ्या ब्रेट लीचा विक्रम मोडला. लीने १९९९ ते २००८ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी ७६ कसोटी सामने खेळले होते. तर, हेझलवूडने आतापर्यंत ७९ कसोटी सामन्यांमध्ये ३११ विकेट्स घेतले आहेत.

या कामगिरीमुळे, हेझलवूड कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याचे लक्ष मिचेल जॉन्सनवर आहे, ज्याने २००७ ते २०१५ दरम्यान ७३ कसोटी सामन्यांमध्ये ३१३ विकेट्स घेतले होते. जर हेझलवूडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील दोन कसोटी सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतले, तर तो जॉन्सनला मागे टाकून सातव्या स्थानावर पोहोचेल.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज

  • शेन वॉर्न – ७०८
  • नॅथन लायन – ५७३
  • ग्लेन मॅकग्रा – ५६३
  • मिचेल स्टार्क – ४४८
  • डेनिस लिली – ३५५
  • पॅट कमिन्स – ३२६
  • मिचेल जॉन्सन – ३१३
  • जोश हॅझलवुड – ३११
  • ब्रेट ली – ३१०
IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

Web Title: Josh hazlewood surpassed brett lee highest test wickets record for australia pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Josh Hazlewood
  • SA vs AUS
  • Test Match

संबंधित बातम्या

SA vs AUS: जे आजवर कुणालाच जमलं नाही, ते Nathan Lyon ने करून दाखवलं! 10व्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला ‘हा’ विश्वविक्रम
1

SA vs AUS: जे आजवर कुणालाच जमलं नाही, ते Nathan Lyon ने करून दाखवलं! 10व्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला ‘हा’ विश्वविक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.