Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi Tournament : रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची विजयी आगेकूच; माटुंगा वर्कशॉपला चारली धूळ

Kabaddi Tournament : रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत माटुंगा वर्कशॉपचा 42-10 असा धुव्वा उडवला. शिवनेरी सेवा मंडळ, दादर यांच्या वतीने आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवातील व्यावसायिक गटाच्या तिसऱ्या फेरीत रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने प्रवेश केला. पुढील फेरीत त्यांचा सामना बीपीटी संघाशी होणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 16, 2026 | 04:23 PM
Kabaddi Tournament : रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची विजयी आगेकूच; माटुंगा वर्कशॉपला चारली धूळ

Kabaddi Tournament : रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची विजयी आगेकूच; माटुंगा वर्कशॉपला चारली धूळ

Follow Us
Follow Us:
  • बीपीटी, पश्चिम रेल्वेचीही आगेकूच
  • कुमार गटात अमर क्रीडा मंडळ, विजय क्लब विजयी
  • महिला गटात विवेक महिला संघाचा मोठा विजय
रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत माटुंगा वर्कशॉपचा 42-10 असा धुव्वा उडवला. शिवनेरी सेवा मंडळ, दादर यांच्या वतीने आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवातील (Kabaddi Tournament) व्यावसायिक गटाच्या तिसऱ्या फेरीत रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने प्रवेश केला. पुढील फेरीत त्यांचा सामना बीपीटी संघाशी होणार आहे.

अजिंक्य कापरेच्या पल्लेदार चढाया आणि साई केरूडच्या पोलादी पकडीच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने माटुंगा वर्कशॉपवर ३२ गुणांनी दणदणीत विजय मिळवला.

बीपीटी, पश्चिम रेल्वेचीही आगेकूच

दुसऱ्या फेरीतील अन्य लढतीत बीपीटीने मुंबई पोलिसांचा 45-20 असा 25 गुणांनी पराभव केला. बीपीटीकडून अनुराग सिंगने चढाईत, तर रूपेश साळुंखेने पकडीत प्रभावी कामगिरी केली. मुंबई पोलिसांकडून विजय घाडगेने चढाईत झुंज दिली.

पश्चिम रेल्वेने नेस्टजेन ॲकॅडमीचा 53-33 असा 20 गुणांनी पराभव केला. पश्चिम रेल्वेकडून प्रणय राणेने चढाईत, तर आकाश शर्माने पकडीत चमक दाखवली. नेस्टजेन ॲकॅडमीकडून निखिल पुजारीने चढाईत आणि सुशांत वाघमोरेने पकडीत योगदान दिले.

सेंट्रल रेल्वेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर 34-20 असा 14 गुणांनी विजय मिळवला. सेंट्रल रेल्वेकडून समीर भोगलेने चढाईत, तर राहुल परबने पकडीत प्रभावी कामगिरी केली. रिझर्व्ह बँकेकडून सुमित मिसाळ आणि शंकर साळुंखे यांनी अनुक्रमे चढाई आणि पकडीत प्रयत्न केले.

IND vs WI : शेवटच्या लढतीआधी टीम इंडियात मोठा बदल; अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर, भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

कुमार गटात अमर क्रीडा मंडळ, विजय क्लब विजयी

कुमार गटात अमर क्रीडा मंडळाने श्रीराम क्रीडा मंडळाचा 53-33 असा 20 गुणांनी पराभव केला. अमर क्रीडा मंडळाकडून साहिल बंगरने चढाईत, तर सागर राजपूतने पकडीत चांगली कामगिरी केली. श्रीरामकडून अमित सिंगने चढाईत आणि हर्ष काळेने पकडीत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

अन्य सामन्यात विजय क्लबने नवोदित क्रीडा मंडळावर 37-28 असा नऊ गुणांनी विजय मिळवला. विजय क्लबकडून श्रेयान पुजारी आणि विजेंद्र यादव यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत योगदान दिले. नवोदित क्रीडा मंडळाकडून तनीक्ष चव्हाणने चढाईत, तर विघ्नेश गुरवने पकडीत कामगिरी केली.

भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती

महिला गटात विवेक महिला संघाचा मोठा विजय

महिला गटात विवेक महिला संघाने जिजामाता महिला संघाचा 42-7 असा 35 गुणांनी धुव्वा उडवला. विवेककडून हरजीत संधूने चढाईत, तर स्विटीने पकडीत प्रभावी कामगिरी केली. जिजामाता संघाकडून वेदिका सावंतने चढाईत आणि कृतिका चव्हाणने पकडीत प्रयत्न केले.

दुसऱ्या सामन्यात डॉ. शिरोडकर संघाने स्वामी समर्थ महिला संघावर 45-25 असा 20 गुणांनी विजय मिळवला. डॉ. शिरोडकर संघाकडून साक्षी सावंतने चढाईत, तर श्रावणी घाडीगावकरने पकडीत चमक दाखवली. स्वामी समर्थ संघाकडून साक्षी जंगमने चढाईत आणि सई शिंदेने पकडीत योगदान दिले.

शिवनेरी कबड्डी महोत्सवातील या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या चपळ चढाया, अचूक पकडी आणि सांघिक कामगिरीमुळे कबड्डीप्रेमींना रंगतदार सामने पाहायला मिळाले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवनेरी कबड्डी महोत्सवात रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने कोणाचा पराभव केला?

    Ans: रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने माटुंगा वर्कशॉपचा ४२-१० असा पराभव केला.

  • Que: रिजनल स्पोर्ट्स बोर्डाचा पुढील सामना कोणाशी होणार आहे?

    Ans: तिसऱ्या फेरीत रिजनल स्पोर्ट्स बोर्डाचा सामना बीपीटी संघाशी होणार आहे.

  • Que: पश्चिम रेल्वेने कोणत्या संघाचा पराभव केला?

    Ans: पश्चिम रेल्वेने नेस्टजेन ॲकॅडमीचा ५३-३३ असा पराभव केला.

Web Title: Kabaddi tournament regional sports board matunga workshop rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • central railway
  • Kabbadi
  • Western Railway

संबंधित बातम्या

Kabaddi Tournament : अमर हिंदचा दणदणीत विजय; सेजल कांबळेची चमकदार कामगिरी, जय भारत-यशचीही आगेकूच
1

Kabaddi Tournament : अमर हिंदचा दणदणीत विजय; सेजल कांबळेची चमकदार कामगिरी, जय भारत-यशचीही आगेकूच

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा
2

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा

Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!
3

Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.