Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi Tournament : अमर हिंदचा दणदणीत विजय; सेजल कांबळेची चमकदार कामगिरी, जय भारत-यशचीही आगेकूच

Kabaddi Tournament : शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी महोत्सवात अमर हिंद मंडळाने महिला गटात भारतमाता महिला संघाचा पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. सेजल कांबळेच्या आक्रमक चढायांनी अमर हिंदच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 15, 2026 | 08:48 PM
Kabaddi Tournament : अमर हिंदचा दणदणीत विजय; सेजल कांबळेची चमक, जय भारत-यशचीही आगेकूच

Kabaddi Tournament : अमर हिंदचा दणदणीत विजय; सेजल कांबळेची चमक, जय भारत-यशचीही आगेकूच

Follow Us
Follow Us:
  • कुमार गटात जय भारतची आगेकूच
  • महिला गटात विश्वशांतीची गरुड भरारी
  • व्यावसायिक गटात बेस्टचा टीबीएमवर दणदणीत विजय
शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी महोत्सवात (Kabaddi Tournament) अमर हिंद मंडळाने महिला गटात भारतमाता महिला संघाचा पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. सेजल कांबळेच्या आक्रमक चढायांनी अमर हिंदच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
कुमार गटात जय भारत सेवा मंडळ आणि यश क्रीडा मंडळाने, तर महिला गटात विश्वशांती क्रीडा मंडळाने विजय मिळवला. व्यावसायिक गटात बेस्ट, पी. डी. हिंदुजा आणि मुंबई पोस्टल संघांनीही प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

महिला गटात अमर हिंद मंडळाने भारतमाता महिला संघाचा 45-30 असा 15 गुणांनी पराभव केला. अमर हिंदकडून सेजल कांबळेने चढाईत, तर सलोनी नाक्तीने पकडीत प्रभावी कामगिरी केली. भारतमातेकडून पायल कांचनने चढाईत, तर दृष्टी कुंभारने पकडीत चांगला खेळ केला. मात्र, अमर हिंदने सामन्यावर वर्चस्व राखत विजय साकारला.

कुमार गटात जय भारतची आगेकूच

कुमार गटात जय भारत सेवा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाचा 36-24 असा 12 गुणांनी पराभव केला. जय भारतकडून आर्यन बावडेकरने चढाईत, तर तन्मय बावकरने पकडीत चमक दाखवली. आकांक्षाकडून ओमकार पवार आणि स्वप्निल पाटील यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत योगदान दिले. याच गटात यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळावर ३५-३१ अशी चार गुणांनी मात केली.

Its Show Time : नीरज गोयात विरुद्ध अँथनी पेटिस असा रंगणार ऐतिहासिक Boxing Match!

महिला गटात विश्वशांतीची गरुड भरारी

महिला गटातील दुसऱ्या सामन्यात विश्वशांती क्रीडा मंडळाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा 32-25 असा सात गुणांनी पराभव केला. विश्वशांतीकडून रोझी डिसोझाने चढाईत, तर शितल मेरांडेने पकडीत चांगली कामगिरी केली. गोल्फादेवी प्रतिष्ठानकडून रचना म्हात्रेने चढाईत, तर जागृती घोसाळकरने पकडीत योगदान दिले.

व्यावसायिक गटात बेस्ट संघाने टीबीएमवर 36-31 अशी पाच गुणांनी मात केली. बेस्टकडून सुरेश पाटीलने चढाईत, तर राहुल परबने पकडीत प्रभावी खेळ केला. टीबीएमकडून पारस शिर्के आणि विकास जोगले यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत प्रयत्न केले.

Cricket: कोंडाळा महालीच्या मुलींची बाजी, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

दुसऱ्या सामन्यात पी. डी. हिंदुजा संघाने आरबीएससीचा 45-37 असा आठ गुणांनी पराभव केला. या निकालांमुळे शिवनेरी कबड्डी महोत्सवातील कुमार, महिला आणि व्यावसायिक गटांतील स्पर्धेची रंगत वाढली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवनेरी कबड्डी महोत्सवात महिला गटात कोणता संघ विजयी झाला?

    Ans: अमर हिंद मंडळाने भारतमाता महिला संघाचा 45-30 असा पराभव केला.

  • Que: कुमार गटात कोणते संघ विजयी झाले?

    Ans: जय भारत सेवा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाचा, तर यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळाचा पराभव केला.

  • Que: व्यावसायिक गटात कोणत्या संघांनी विजय मिळवला?

    Ans: बेस्ट, पी. डी. हिंदुजा आणि मुंबई पोस्टल या संघांनी आपापल्या सामन्यांत विजय मिळवला.

Web Title: Shivneri kabaddi tournament amar hind sejal kamble jai bharat mumbai postal rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Best
  • Hinduja group
  • Kabbadi

संबंधित बातम्या

Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!
1

Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.