Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच

Cricket News: दुसऱ्या सामन्यात राकेश माळीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कल्याण क्लबने ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह कल्याण क्लबने स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 24, 2026 | 09:45 PM
Spartan Monsoon League

Spartan Monsoon League

Follow Us
Follow Us:

लेजंड्स स्पोर्ट्स क्लबचे सलग विजय
लेजंड्सचा टायटन बुल्सवर ५७ धावांनी विजय
कल्याण क्लबची ब्रेव्हहार्टवर ५ गडी राखून मात

पुणे/Pune Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे यांच्या वतीने आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत लेजंड्स स्पोर्ट्स क्लब आणि कल्याण क्लब यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत विजयी मालिका कायम ठेवली. सिंहगड रोडवरील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघांनी प्रभावी कामगिरी करत आगेकूच केली. अजिंक्य जैनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने (Cricket) टायटन बुल्सचा ५७ धावांनी सहज पराभव केला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने १८ षटकांत २१६ धावांचा डोंगर उभा केला. संकेत जोशीने ६८ धावांची दमदार खेळी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्याला अजिंक्य जैनने २४ धावा, अच्युत मराठेने २४ धावा, समीर पंचपोरने २९ धावा आणि शंतनु आठवलेने २७ धावा करत चांगली साथ दिली.

 लेजंड्स क्लबचा ५७ धावांनी विजय

२१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टायटन बुल्सचा डाव १५९ धावांवर आटोपला. संतोषकुमार सांगळेने ७० धावांची झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, लेजंड्सच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत त्यांचा डाव रोखला. अष्टपैलू अजिंक्य जैनने ४५ धावांत ३ गडी बाद करत गोलंदाजीतही आपली छाप पाडली. केतन पासलकरने २ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. अखेर लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने ५७ धावांनी विजय मिळवला.

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

राकेशच्या गोलंदाजीने कल्याण क्लब विजयी

दुसऱ्या सामन्यात राकेश माळीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कल्याण क्लबने ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह कल्याण क्लबने स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवला.प्रथम फलंदाजी करताना ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने १९१ धावांचे लक्ष्य उभे केले. नेल्सन एरीकने ४७ धावा, अभिषेक परांगेने ३२ धावा आणि नीरज शर्माने ३९ धावा करत संघाची धावसंख्या वाढवली.कल्याण क्लबकडून राकेश माळीने ३३ धावांत ३ गडी बाद करत प्रभावी गोलंदाजी केली.

लट्ठ गाड़ दिया! Haryana च्या वाघिणींनी पुणे हादरवले; हॉकी इंडिया स्पर्धेत झारखंडला लोळवले

आकाश शहाने २ गडी बाद करत त्याला साथ दिली.विजयासाठी आवश्यक १९२ धावांचे लक्ष्य कल्याण क्लबने १९.१ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. फलंदाजीत जितेंद्र राऊतने ४३ धावा, रोहित गुगळेने ३५ धावा, मयुर गटाळेने ३३ धावा, चिराग शेरकरने नाबाद ३१ धावा आणि मिहीर रिसबुडने २२ धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.चिराग शेरकरने अखेरपर्यंत संयमी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

Web Title: Kalyan club legends cricket sports club secure wins spartan monsoon league pune cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली
1

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…
3

Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…

सुषमा अंधारे, रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
4

सुषमा अंधारे, रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.