
Srikanth Kidambi China Masters quarters
‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत दोन खेळाडूंमध्ये एक अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या सेटच्या सुरुवातीला ३-७ ने मागे असूनही श्रीकांतने लाईच्या चुकांचा फायदा उचलत स्कोअर ८-८ असा बरोबरीत आणला. कॅनेडियन खेळाडूने मात्र मध्यांतरात दोन गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर त्याने १५-११ अशी आघाडी घेतली. मात्र, श्रीकांतने जोरदार पुनरागमन करत १५-१५ अशी बरोबरी साधली. आणखी एका क्रॉस-कोर्ट स्मॅशमुळे श्रीकांतला १८-१६ अशी आघाडी मिळाली. त्यानंतर त्याने तीन गेम पॉईंट्स मिळवले आणि आपल्या दुसऱ्या पॉईंटवर सेट जिंकला.
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला श्रीकांतकडून चुका झाल्या आणि तो ५-९ ने मागे पडला. मात्र, या भारतीय खेळाडूने कमबॅक केले. ९-१४ ने मागे असताना, त्याने दोन जोरदार शॉट्स आणि लाईच्या चुकांचा फायदा घेत स्कोअर १३-१४ असा बरोबर केला. त्यानंतर स्कोअर १८-१८ असा बरोबर झाला. परंतु अखेरीस श्रीकांतने तो सेट २१-१९ अशा निसटत्या फरकाने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता चायना मास्टर्स २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या ली चेउक यिउशी होईल.
नुकतेच महिला एकेरीमध्ये तैपेई ओपन वर्ल्ड टूर सुपर 300 चे विजेतेपद पटकावलेल्या तन्वी शर्मा, दुसऱ्या फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या तोमोका मियाझाकीकडून १७-२१, २१-१८, १६-२१ ने पराभूत झाली. ६६ मिनिटांच्या या सामन्यात तन्वी शर्मा पहिला सेट १७-२१ ने हरली, पण त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत तो २१-१८ ने जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. परंतु,तिसऱ्या सेटमध्ये जपानी खेळाडूने २१-१६ ने जिंकून सामना आपल्या नावावर केला. मिश्र दुहेरीमध्ये चायनीज तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग आणि ह्सू यिन हुई यांच्याकडून १८-२१, १८-२१ ने पराभूत झाल्यामुळे भारताचे ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो हे देखील स्पर्धेतून बाहेर पडले .