Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Beat SRH: कोलकात्याने रोखला हैदराबादचा ‘विजय रथ’; घरच्या मैदानात धुव्वा उडवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या!

KKR vs SRH: आयपीएल 2026 मध्ये कोलकात्याने हैदराबादचा 5 सामन्यांचा विजय रथ रोखला आहे. अंगकृष रघुवंशीच्या 59 धावांच्या जोरावर केकेआरने 8 गडी राखून विजय मिळवला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 07:30 PM
कोलकात्याने रोखला हैदराबादचा 'विजय रथ' (Photo Credit- X)

कोलकात्याने रोखला हैदराबादचा 'विजय रथ' (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • कोलकात्याने रोखला हैदराबादचा ‘विजय रथ’
  • घरच्या मैदानात धुव्वा उडवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या!
  • रघुवंशी-रहाणेची चमकदार कामगिरी
KKR vs SRH IPL 2026: आयपीएल 2026 (IPL 2026) च्या 45 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ‘विजय रथ’ रोखला आहे. रविवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत कोलकात्याने 8 गडी राखून दणदणीत विजय संपादन केला. या विजयासह केकेआरने यापूर्वी हैदराबादकडून झालेल्या 65 धावांच्या पराभवाचा वचपा काढला असून प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आहे.

रघुवंशी-रहाणेची चमकदार कामगिरी

हैदराबादने दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने 18.2 षटकांत केवळ 3 गडी गमावून विजय साकारला. कोलकात्याकडून अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक 59 धावांची (47 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार) अर्धशतकीय खेळी केली.

KKR make it three consecutive wins — they pulled things back in the first innings and then chased down 166 in Hyderabad! 💜🔥#IPL2026 #SRHvKKR #Sportskeeda pic.twitter.com/XGkJNokpau — Sportskeeda (@Sportskeeda) May 3, 2026

सलामीवीर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (43 धावा) आणि फिन ॲलन (29 धावा) यांनी संघाला 49 धावांची दमदार सुरुवात करून दिली. ॲलन बाद झाल्यानंतर रहाणे आणि रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत हैदराबादला बॅकफुटवर ढकलले. शेवटी उपकर्णधार रिंकू सिंगने 11 चेंडूत नाबाद 22 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Sunil Narine Record: सुनील नरेनने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

हैदराबादची फलंदाजी कोसळली

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा डाव 19 षटकांत 165 धावांवर आटोपला. ट्रॅव्हिस हेडने 28 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी केली, ज्यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सलामीवीर इशान किशनने 42 धावांचे योगदान दिले, मात्र त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. हैदराबादची मधली फळी या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली. हेनरिक क्लासेन (11), स्मरण रविचंद्रन (4) आणि अनिकेत वर्मा (6) यांसारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. हैदराबादने आपले शेवटचे ८ फलंदाज केवळ ६० धावांच्या अंतरात गमावले, ज्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

वरुण चक्रवर्तीचा फिरकीचा जादू

कोलकात्याच्या गोलंदाजांनी या सामन्यात अचूक टप्पा राखला. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने 3 बळी घेत हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २ बळी घेत उत्तम साथ दिली. वैभव अरोरा, कॅमेरून ग्रीन आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.

प्लेऑफची समीकरणे

या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचे 9 सामन्यांत 7 गुण झाले असून त्यांचे प्लेऑफमधील आव्हान जिवंत आहे. दुसरीकडे, सलग पाच विजय मिळवल्यानंतर हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादचे 10 सामन्यांत 12 गुण असून ते अजूनही गुणतालिकेत सुस्थितीत आहेत.

GT vs PBKS Live: शुभमन गिलचा टॉसवर ताबा! अहमदाबादमध्ये पंजाबला दिले फलंदाजीचे आव्हान; पाहा कोणाला मिळाली संधी?

Web Title: Kkr beat srh by 8 wickets ipl 2026 playoff race

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • cricket news
  • IPL 2026
  • KKR vs SRH

संबंधित बातम्या

RCB Vs LSG Pitch Report: विराट कोहली विरुद्ध शामी? टॉस जिंकून थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट
1

RCB Vs LSG Pitch Report: विराट कोहली विरुद्ध शामी? टॉस जिंकून थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट

माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन; वयाच्या 36 व्या जगाला निरोप, क्रिकेट विश्वात शोक
2

माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन; वयाच्या 36 व्या जगाला निरोप, क्रिकेट विश्वात शोक

SRH चं वादळ! PBKS चा सुपडासाफ; कॉनलीची शतकी झुंज अपयशी, ‘किंग्ज’चा 33 रन्सने दणदणीत पराभव
3

SRH चं वादळ! PBKS चा सुपडासाफ; कॉनलीची शतकी झुंज अपयशी, ‘किंग्ज’चा 33 रन्सने दणदणीत पराभव

IPL 2026: शशांकचा तो ‘ड्रॉप कॅच’ अन् Shreyas चा भयानक अवतार; मैदानात काय घडलं? पाहा Viral Video
4

IPL 2026: शशांकचा तो ‘ड्रॉप कॅच’ अन् Shreyas चा भयानक अवतार; मैदानात काय घडलं? पाहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.