सुनील नरेनने रचला इतिहास! (Photo Credit- X)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुनील नरेनने आयपीएल कारकिर्दीतील 200 बळी पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात 200 विकेट्सचा टप्पा गाठणारा तो पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. याआधी केवळ युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार या भारतीय गोलंदाजांनाच हा टप्पा गाठता आला होता. विशेष म्हणजे, 2012 पासून नरेन केवळ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळत असून, एकाच संघासाठी 200 विकेट घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.
A cracking delivery to reach his 200th IPL wicket – just Sunil Narine things 🫡pic.twitter.com/DZwWfPpHmk — Cricbuzz (@cricbuzz) May 3, 2026
| गोलंदाज | बळी |
| युजवेंद्र चहल | 228 |
| भुवनेश्वर कुमार | 215 |
| सुनील नरेन | 201 |
| पीयूष चावला | 192 |
| आर. अश्विन | 187 |
Rajasthan Royals विकली गेली रे..! तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा; कोण आहे हा नवा ‘किंग’?
सुनील नरेनने 197 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत 6.8 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने हे यश मिळवले आहे. 100 हून अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये नरेनचा इकॉनॉमी रेट हा सर्वोत्तम आहे. त्याने आयपीएलमध्ये 8 वेळा 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची किमया केली आहे, ज्यामध्ये एक हॅट्ट्रिक आणि 5 विकेट्सच्या हॉलचा समावेश आहे.
केवळ गोलंदाजीच नाही, तर नरेनने फलंदाजीतही आपल्या नावाचा दरारा निर्माण केला आहे. आयपीएलमध्ये त्याने 165.30 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 1820 धावा केल्या असून त्यात 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. यासह आयपीएल इतिहासात 1000 धावा आणि 200 विकेट्सचा ‘डबल’ पूर्ण करणारा तो जगातील पहिला अष्टपैलू ठरला आहे.
एकूण टी-20 कारकिर्दीचा विचार केल्यास, 591 सामन्यांत 621 बळी घेणारा नरेन हा राशिद खान आणि ड्वेन ब्राव्होनंतर जगातील तिसरा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. तीन वेळा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ (MVP) ठरलेल्या नरेनने आपल्या अष्टपैलू कामगिरीने आपण आजही क्रिकेटमधील सर्वात धोकादायक खेळाडू असल्याचे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे.
चला पॅकअप करा! साधं जिंकताही आलं नाही; CSK ने MI ला चारली धूळ, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं






