शुभमन गिलचा टॉसवर ताबा! अहमदाबादमध्ये पंजाबला दिले फलंदाजीचे आव्हान (Photo Credit- X)
🚨 𝑻𝑶𝑺𝑺 𝑼𝑷𝑫𝑨𝑻𝑬 🚨 Shubman Gill has won the toss and Gujarat Titans have opted to bowl first! 💙🪙#GTvPBKS #IPL2026 #Sportskeeda pic.twitter.com/qWosRXtlwJ — Sportskeeda (@Sportskeeda) May 3, 2026
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, नेहल वढेरा, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
आतापर्यंत, गुजरात आणि पंजाब यांच्यात एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये पंजाबचे पारडे जड राहिले असून, त्यांनी त्यापैकी 4 सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे. उर्वरित 3 सामने गुजरातने जिंकले आहेत. या हंगामातील या दोन संघांमधील हा दुसरा सामना आहे. त्यांच्या मागील लढतीत, पंजाबने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला होता. गेल्या हंगामात या दोन संघांमध्ये केवळ एकच सामना खेळला गेला होता आणि त्या सामन्यातही पंजाबच विजयी ठरला होता. आता आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
यस अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाबने 8 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. संघाला केवळ 1 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर उर्वरित 1 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली, गुजरातने 9 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये, गुजरातने 5 वेळा विजय मिळवला असून उर्वरित 4 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी, पंजाबविरुद्धचा विजय गुजरातसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
Rajasthan Royals विकली गेली रे..! तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा; कोण आहे हा नवा ‘किंग’?






