
IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान
कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियवर खेळपट्टी फलंदाजासाठी अधिक फायदेशीर मानली जाते. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये, वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. पण जसजसा सामना पुढे जाईल, तसतसे फिरकी गोलंदाज आपले वर्चस्व गाजवू शकतात. आउटफिल्ड फास्ट असल्याने ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. परंतु, क्षेत्ररक्षणासाठी आव्हानात्मक ठरु शकते. आयपीएलच्या इतिहासात ईडन गार्डन्स स्टेडियमवर एकूण १०६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ४४ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत, तर ६० सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तसेच, २ सामने पावसामुळे अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १६५ धावा आहे. याशिवाय, नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी ५३ सामने जिंकले आहेत, तर ५१ सामने नाणेफेक हरणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. या हंगामात, ५ सामन्यांपैकी ३ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. तसेच, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी २०० पेक्षा जास्त धावा करून विजय मिळवला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर केकेआरचे पारडे जड आहे. आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघांमध्ये एकूण ३६ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी केकेआरने २० आणि दिल्लीने १५ सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला.
कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, तेजस्वी दहिया, सुनील नरेन, अनुकुल रॉय, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे.
दिल्ली कॅपिटल्स : केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, साहिल पारख, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल (क), माधव तिवारी, त्रिपुराना विजय, लुंगी एनगिडी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार.
IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…